मतदानाच्या एकदिवस आधी पैसे वाटप केल्याचा आरोपावरुन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे अडचणीत सापडले आहेत. विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. यावरुन विरारमध्ये मोठा राडा पाहायला मिळत आहे. बविआचे प्रमुखे हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मागील अनेक तासांपासून विवांता हॉटेलमध्ये अडकलेल्या विनोद तावडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. विनोद तावडे यांना म्हटलं की, "नालासोपाऱ्यात आज कार्यकर्त्यांची बैठक होती. मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय आहेत, हे सांगायला मी इथे आलो होतो. मात्र हिंतेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांचा असा गैरसमज झाला की मी इथे पैसे वाटायला आलो आहे. जर पैसे वाटप होत असेल तर पोलीस आणि निवडणूक आयोग याबाबत चौकशी करतील."
(नक्की वाचा- VIDEO : पैसे वाटपाचा आरोप, विनोद तावडेंना घेरलं; विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा फुल राडा)
भाजपच्याच नेत्यांनी दिली माहिती
विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन येत असल्याची आम्ही भाजपच्याच नेत्यांनी माहिती दिली होती. आम्हाला वाटलं राष्ट्रीय नेता पैसे वाटप करणार नाही. मात्र पैसे वाटप आधीच झाले. मात्र विनोद तावडे तिथे एक बैठक घेत होते. विनोद तावडे राष्ट्रीय नेते आहेत मात्र त्यांना मतदानाच्या याधी मतदारसंघ सोडावा एवढी अक्कल नाही का? असा सवाल हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित केला.
(नक्की वाचा- "माझी चूक झाली, मला इथून सोडवा, विनोद तावडेंचा फोन", हिंतेंद्र ठाकूरांचा दावा )
"गुन्हा दाखल केल्याशिवाय सोडणार नाही"
आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय त्यांना आम्ही सोडणार नाही. आता मी देखील तिथे पोहचत आहे. पोलिसांना कारवाई केली तर ठीक. अन्यथा त्यांना उद्या मतदान संपेपर्यंत विनोद तावडेंचा मुक्काम तिथेच असेल, असा इशाराही हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. भाजपच्या नेत्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे करताय ते फार चांगलं करत आहात. हे करत राहा, धडा शिकवा, अशी विनंती मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांने केली आहे. ते नेते कोण ते समजून घ्या, असा खळबळजनक दावा देखील हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.