NCP News: विलिनीकरणाचा प्लॅन, 12 फेब्रुवारीला होणार होती घोषणा? शरद पवार-अजितदादांच्या बैठकीचा VIDEO समोर

NCP Merger News: महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी दोन्ही गट एकत्र येऊन ताकदीने मैदानात उतरणार होते, असा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

NCP Merger News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच, एक महत्त्वाचा व्हिडीओ समोर आला आहे. 17 जानेवारी 2026 रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली होती, ज्याचा व्हिडिओ आता समोर आला असून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत जयंत पाटील, रोहित पवार, शशिकांत शिंदे, राजेश टोपे आदी नेते बैठकीला उपस्थित आहेत. अजित पवार गटाकडून स्वत: अजित पवार वगळता इतर कोणताही नेता येथे दिसत नाही. ही बैठक नेमकी कशासाठी होती हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणांच्या चर्चांदरम्यान हा व्हिडीओ समोर आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.   

(नक्की वाचा-  Sharad Pawar on NCP: शरद पवारांची 3 मोठी विधाने, दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणची शक्यता मावळली?)

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. यासाठी 12 फेब्रुवारी ही तारीख जाहीर करण्यासाठी निश्चित करण्यात आली होती. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर दोन्ही गट एकत्र येणार होते, असा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

(नक्की वाचा-  Ajit Pawar News: मंचावर आले, दोनच वाक्य बोलले; अजितदादांना श्रद्धांजली वाहताना महेश लांडगे भावुक)

शशिकांत शिंदे काय म्हणाले?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे याबाबत म्हटलं की, "अजितदादांकडून पक्ष विलिनीकरणाचा चर्चा झाली होती. त्यानुसार आम्ही सर्व पवार साहेबांना भेटायला गेला. त्यावेळी पक्ष विलिनीकरणाबाबत पवार साहेबांची भेट घेऊन त्यांना सर्व सांगितलं. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीदरम्यान ही चर्चा सुरू झाली होती. म्हणूनच आम्ही घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होतं. आमचं यामागे कोणतंही राजकारण नाही. कालपासून आम्ही सत्य परिस्थितीच मांडत आहोत. आमचा त्यात सार्थ नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची खरोखर इच्छा होती."

Advertisement


पाहा VIDEO

Topics mentioned in this article