VIirar News: UTS अ‍ॅपचा घोळ? टीसी आणि महिला प्रवाशामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं?

Virar News: विरार स्थानकावर UTS ॲप चालत नसल्याने तिकीट दाखवण्यास उशीर झाला, ज्यावरून टीसी आणि महिला प्रवाशामध्ये जोरदार खडाजंगी झाली. तांत्रिक अडचणींसाठी प्रवाशांना जबाबदार धरू नका, अशी मागणी आता जोर धरत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Virar News: लोकल ट्रेनमध्ये प्रवासासाठी आता डिजिटल तिकीटांचा वापर वाढला आहे. मात्र, याच डिजिटल सुविधेमुळे विरार रेल्वे स्थानकावर एक मोठा वाद निर्माण झाला. विरार रेल्वे स्थानकावर तिकीट तपासनीस (TC) आणि एका महिला प्रवाशामध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वेच्या UTS ॲपमधील तांत्रिक बिघाड आणि तिकीट तपासणीची पद्धत यावरून हा वाद उफाळून आला.

वादाचे नेमके कारण काय?

व्हिडीओतील दृश्यांवरून असं दिसून येत आहे की, तांत्रिक अडचणीमुळे हा वाद सुरू झाला. महिला प्रवाशाने एका टीसीला तिकीट दाखवून पुढे जात असताना, दुसऱ्या टीसीने त्यांना पुन्हा अडवले आणि तिकीट दाखवण्यास सांगितले. घाईत असताना मोबाइलमधील 'UTS ॲप' नीट लोड होत नव्हते. ॲप उघडण्यास वेळ लागत असल्याने टीसीने दंड आकारण्याची किंवा कारवाईची भाषा केल्याने वादाला तोंड फुटले.

पाहा VIDEO

(नक्की वाचा-  रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी)

"ॲप चालत नसेल तर आमची काय चूक?"

संतापलेल्या महिला प्रवाशाने विचारणा केली की, "जर रेल्वेचे अधिकृत UTS ॲपच नीट चालत नसेल, तर त्यात आमची काय चूक? आम्ही घाईत ट्रेन पकडण्यासाठी येतो. तिकीट दाखवण्याच्या तांत्रिक प्रक्रियेत जर आमची ट्रेन सुटली, तर त्याला जबाबदार कोण?"

Advertisement

(नक्की वाचा-  Shivneri Bus: मुंबई-पुण्यानंतर राज्यभर धावणार 'शिवनेरी'! 'या' 8 नवीन मार्गांवर सुरू होणार सेवा)

प्रवाशांची मागणी

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून, तिकीट तपासणीदरम्यान प्रवाशांना अनावश्यक त्रास देऊ नये. तसेच तांत्रिक अडचणींबाबत रेल्वे प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. वारंवार क्रॅश होणारे किंवा स्लो चालणारे UTS ॲप रेल्वेने अद्ययावत करावे, जेणेकरून प्रवाशांना तपासणीदरम्यान विनाकारण थांबून राहावे लागणार नाही.
 

Topics mentioned in this article