जाहिरात
Story ProgressBack

पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट? चारही धरणामध्ये उरला फक्त 23 टक्के साठा

पुणे शहरालाही या पाणी टंचाईचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठी कमालीचा कमी झाला आहे.

Read Time: 2 mins
पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट?  चारही धरणामध्ये उरला फक्त 23 टक्के साठा
पुणे:

सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे. तर बऱ्याच ठिकाणी दोन दोन दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. आता पुणे शहरालाही या पाणी टंचाईचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठी कमालीचा कमी झाला आहे. सध्या या चारही धरणामध्ये 23 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुणेकरावर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. याबाबत कालवा समितीच्या बैठक निर्णय होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट

पुण्याला आजही एक दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. तर उपनगरातल्या बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे आधीच पाणी टंचाई आहे. त्यात पाणी कपातीचे संकट आत पुणेकरांवर आहे. पुण्यात कोंढवा, लुल्लानगर, लोहगाव, कल्याणीनगर, बावधन, आंबेगाव, सिंहगड रोडचा काही भाग, धायरी या ठिकाणी आजही टँकरने पाणी पुरवठा होत आहे. पुणेकरांना दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठी सध्या धरणात आहे. 

हेही वाचा - रत्नागिरीत येणाऱ्या पर्टकांची संख्या रोडावली, 'हे' आहे प्रमुख कारण

कोणत्या धरणात किती पाणी? 

पुण्याला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणातून पाणी पुरवठा होत असतो. सध्या खडकवासला  धरणात 1.21 TMC पाणीसाठी शिल्लक आहे. तर पानशेत धरणात 2.02 TMC,वरसगाव धरणात 3.28 TMC आणि  टेमघर  धरणात 0.19 TMC पाणी शिल्लक आहे. हा पाणी साठा पुढील दोन महिने पुरेल इतकाच आहे. 

हेही वाचा - लोकसभा निवडणुकीतील मतदानावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी; महिला सरपंचाचे कुटुंब गंभीर जखमी

उन्हाचा चटका बसणार 

एकीकडे पाणी कपातीचे संकट डोक्यावर असताना पुणेकरांना पुढच्या काही दिवसात उन्हाचे चटकेही सहन करावे लागणार आहेत. येत्या तीन दिवसात पारा चाळीशीपार जाईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.  पूर्व मौसमी पावसाचा प्रभाव ओसरल्याने पुन्हा उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. तीन दिवसांपासून सातत्याने कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. आकाश निरभ्र असल्याने तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत उसळेल. विशेषता पुण्यात  शुक्रवार, शनिवार आणि रविवारी उन्हाची तीव्रता वाढणार आहे. 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
IAS सुजाता सौनिक राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव, पदभार स्वीकारला
पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट?  चारही धरणामध्ये उरला फक्त 23 टक्के साठा
blast in dombivli midc phase 2 company update
Next Article
Video : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी
;