जाहिरात
This Article is From May 17, 2024

रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली, 'हे' आहे प्रमुख कारण

कोकणचं पर्यटन मात्र ऐन उन्हाळ्यात थंड पडलं आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या यावर्षी मात्र रोडावली आहे. त्याचा थेट परिणाम इथल्या पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवरही झालेला आहे.

रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली, 'हे' आहे प्रमुख कारण
रत्नागिरी:

राकेश गुडेकर 

एप्रिल संपून मे महिना सुरू झाला आहे, मुलांना सुट्ट्या देखील पडल्या आहेत. पण कोकणचं पर्यटन मात्र ऐन उन्हाळ्यात थंड पडलं आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या यावर्षी मात्र रोडावली आहे. त्याचा थेट परिणाम इथल्या पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवरही झालेला आहे. त्यामुळे कोकण सध्या पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे.

Latest and Breaking News on NDTV

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोकण.. निळाशार समुद्र.. स्वच्छ किनारपट्टी.. खाड्या.. नारळी-पोफळीच्या बागा, प्रसिद्ध देवस्थानं, डोंगर-दऱ्यांतून जाणारे नागमोडी रस्ते आणि प्रवासात दिसणारी हिरवीगार वृक्षवल्ली. ही कोकणची वैशिष्ट्ये.. हे सर्व निसर्ग सौंदर्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकणात येत असतात. समुद्र किनारपट्टी तर पर्यटकांनी गजबजलेली असते. त्यामुळेच नववर्ष स्वागत असो, मे महिन्याची सुट्टी असो, किंवा दिवाळीची सुट्टी असो, पर्टकांची सर्वाधिक पसंती असते ती कोकणच्या किनारपट्टीला. आंजर्ले, केळशी, कर्दे, लाडघर, गुहागर, मुरुड, गणपतीपुळे, रत्नागिरी, तारकर्ली, मालवण अशा सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर लाखो पर्यटकांची गर्दी या सुट्ट्यांमध्ये असते. मे महिन्यात तर पर्यटकांची ही गर्दी लाखोंच्या संख्येने ओसंडून वाहत असते. 

Latest and Breaking News on NDTV

हेही वाचा - मुंबईत वाकयुद्ध रंगणार! मोदी राज एकाच मंचावर तर केजरीवालही ठाकरेंच्या जोडीला

पण यावर्षीच्या या हंगामात मात्र पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरविल्याचं चित्र आहे. मुलांना सुट्ट्या पडल्या आहेत. पण तरीही म्हणावी तशी पर्यटकांची गर्दी यावर्षी कोकणात दिसत नाही. त्याचं मुख्य कारण लोकसभा निवडणूक. शासकीय कर्मचारी वर्ग या निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. तसेच प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या उमेदवाराच्या प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे जे 20 ते 25 जणांच्या ग्रुपने पर्यटनाला बाहेर पडायचे, ते प्रमाण यावर्षी 8 ते 10 वर आलं आहे.

Latest and Breaking News on NDTV

हेही वाचा - मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक; वेळेत बदल, जाणून घ्या अपडेटेड वेळापत्रक

पर्यटकांची संख्खा खूपच कमी असल्याने साहजिकच त्याचा परिणाम इथल्या साहसी पर्यटन खेळांवर झाला आहे. बोटिंग, उंट सफारी, हॉर्स राईट, ए टीव्ही राईट, जम्पिंग, छोट्या कार राईट यांची आर्थिक उलाढाल 60 ते 70 टक्के घटली आहे. या व्यवसायिकां प्रमाणेच किनारपट्टीवरील छोट्या व्यवसायिकांवर देखील याचा मोठा परिणाम झालेला आहे. पावसाळ्यातील चार महिन्याची बेगमी आता होणाऱ्या उत्पन्नावरच केली जाते. मात्र सध्या मालात गुंतवलेले पैसे देखील निघत नाहीयेत. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं हे रत्नागिरीतले व्यवसायिक सांगत आहेत. पर्यटकांची संख्या रोडावल्याने त्याचा थेट परिणाम कोकणातल्या हॉटेल आणि लॉज व्यवसायावर देखील झाला आहे. 20 मे नंतर तरी पर्यटक वाढतील अशी आशा आता या व्यवसायिकांना आहे.

Latest and Breaking News on NDTV

हेही वाचा - घाटकोपर दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक

गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे एप्रिल महिन्यात 2 लाख 98 हजार 415 भाविकांची नोंद झाली होती. यावर्षी एप्रिल महिन्यात ही संख्या 1 लाख 88 हजार 51 एवढीच आहे. म्हणजे एप्रिल महिन्यात 1 लाख 10 हजार पर्यटक कमी आले आहेत.  तर 1 ते 10 मे पर्यंत गेल्यावर्षी  1 लाख 51 हजार 902 भाविकांची नोंद झाली होती. मात्र या मे महिन्याच्या 10 दिवसांत ही संख्या 88 हजार 170 एवढीच आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com