जाहिरात

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; 'या' भागात होणार रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा

Pune Water Shortage News : दक्षिण पुण्याला रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पाणी जपून वापरावं लागणार आहे. 

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; 'या' भागात होणार रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा

रेवती हिंगवे, पुणे

Pune Water Shortage : राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. पुणेकरांना देखील आता पाणीटंचाईमुळे पाणी कपातीची फटका बसणार आहे.  पुणे शहरात पाणी कपातीला सुरुवात करण्यात आली आहे. दक्षिण पुण्याला रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पाणी जपून वापरावं लागणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वाढत्या उष्णतेमुळे शहरासह उपनगर भागात पाण्याची मागणी वाढली आहे. अनेक भागात पुरेशा प्रमाणात पाणी पुरवण्यासाठी महापालिकेला मोठी कसरत करावी लागत आहे. वडगांव जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी पुरवठा होणाऱ्या भागांत आता रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा केला जाणार आहे. 

(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)

सिंहगड रस्ता भाग, सहकारनगर, धनकवडी, बालाजी नगर, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक या भागाचा रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा केला जाणार आहे. या भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याने आता 5 मेपासून रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच विभागवार पाणी पुरवठाही बंद ठेवण्यात येणार आहे.

(नक्की वाचा- Jalgaon Politics : जळगावात शरद पवारांना मोठा धक्का; दोन शिलेदार अजित पवारांसोबत जाणार)

पाणी बचतीसाठी काय करावं?

पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. जसं की, दात घासताना, दाढी करताना किंवा आंघोळ करताना नळ चालू ठेवू नका. गळती असलेले नळ आणि पाईप दुरुस्त करा. पाण्याचा अनावश्यक वापर टाळा. तसेच पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: