Maharashtra Political News : राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भवितव्याबाबत आज एक महत्त्वाची घडामोड पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील बैठक नुकतीच पार पडली. या भेटीत कोकाटे यांनी अजित पवारांकडे दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरून किंवा घडलेल्या काही वादग्रस्त घटनांवरून अजित पवारांकडे आपली माफी मागितली. तसेच, भविष्यात अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत, असे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण यापूर्वी अशी चर्चा होती की, माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हटवलं जाण्याची जाण्याची शक्यता कमी असली तरी, त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाऊ शकते.
(नक्की वाचा- Eknath Khadse : जावयानंतर माझ्यावरही पाळत का ठेवली? खडसेंच्या घराबाहेर साध्या वेशातील पोलीस, रोहिणी खडसेंनी व्हिडिओ केला शूट)
मात्र या बैठकीनंतर लगेचच अजित पवारांच्या दालनात 'प्री-कॅबिनेट' बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, कोकाटे यांच्या भवितव्याबाबतचा सर्वस्वी निर्णय आता अजित पवार जाहीर करतील, असे स्पष्ट झाले आहे. अजित पवार हे त्यांच्या कठोर भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यामुळे, कोकाटे यांच्यावरील आरोपांबाबत आणि त्यांच्या माफीनंतर अजित पवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(नक्की वाचा - Rajnath Singh: 'ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? ', संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण)
विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावर कायम ठेवले जाते की त्यांच्याकडून खाते काढून घेतले जाते, हे लवकरच स्पष्ट होईल.