जाहिरात

Tender Vote: तुमचं मतदान आधीच कुणी केलं तर काय कराल? 'टेंडर व्होट' काय आहे?

What is Tender Vote: जेव्हा एखादा खरा मतदार मतदान केंद्रावर पोहोचतो, पण त्याला समजते की त्याच्या नावावर आधीच कोणीतरी मतदान केले आहे, तेव्हा तो टेंडर व्होट मागू शकतो.

Tender Vote: तुमचं मतदान आधीच कुणी केलं तर काय कराल? 'टेंडर व्होट' काय आहे?

राज्यभरात आज 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. मात्र अनेक ठिकाणी मतदार पोहोचण्याच्या आधीच त्यांचं मतदाना कुणीतरी केलं होतं. त्यामुळे या मतदारांचा काहीसा हिरमोड झाला. आपलं मतदान कुणीतरी केल्याचे आढळल्यास, तुमचा लोकशाहीतील हक्क अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने 'टेंडर व्होट' ही तरतूद केली आहे.

टेंडर व्होट म्हणजे काय?

जेव्हा एखादा खरा मतदार मतदान केंद्रावर पोहोचतो, पण त्याला समजते की त्याच्या नावावर आधीच कोणीतरी मतदान केले आहे, तेव्हा तो टेंडर व्होट मागू शकतो. निवडणूक संचालन नियम, 1961 च्या कलम 49-पी (Rule 49P) अंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल उशिरा लागणार? उमेदवारांची धाकधूक वाढली)

टेंडर व्होट मिळवण्यासाठी काय करावे?

  • तिथल्या पीठासीन अधिकाऱ्याला सांगा की तुमच्या नावावर बोगस मतदान झाले आहे.
  • तुमचे मतदार ओळखपत्र (Voter ID) किंवा इतर वैध कागदपत्रे दाखवून तुम्हीच खरे मतदार आहात हे सिद्ध करा.
  • अधिकारी तुमची खात्री पटवण्यासाठी काही प्रश्न विचारू शकतात. खात्री पटल्यानंतर ते तुम्हाला 'टेंडर व्होट' देण्यास परवानगी देतील.

मतदानाची पद्धत

  • टेंडर व्होट हे ईव्हीएम मशीनद्वारे दिले जात नाही.
  • अधिकाऱ्याकडून तुम्हाला एक स्वतंत्र मतपत्रिका (Ballot Paper) दिली जाईल.
  • या मतपत्रिकेवर तुमच्या पसंतीच्या उमेदवारासमोर शिक्का मारून तुम्ही मतदान करू शकता.
  • तुमचे मत एका विशेष लिफाफ्यात बंद करून पीठासीन अधिकाऱ्याकडे दिले जाते. ही मते स्वतंत्रपणे जपून ठेवली जातात.

(नक्की वाचा-  Kalyan News: उत्साहात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेलेल्या महिलेला धक्का; नेमकं काय झालं?)

या मतांची गणना कधी होते?

टेंडर व्होट्सची गणना सामान्यतः सुरुवातीला केली जात नाही. मात्र, जर दोन उमेदवारांमधील विजयाचे अंतर अतिशय कमी असेल आणि टेंडर व्होट्सच्या संख्येमुळे निकालावर परिणाम होऊ शकत असेल, तरच न्यायालयाच्या आदेशानुसार किंवा विशेष परिस्थितीत या मतांची मोजणी केली जाते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com