
What is Circuit Bench: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरात सर्किट बेंच मागणीला अखेर 40 वर्षानंतर यश आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी सर्किट बेंच मंजुरीची अधिसूचना जारी केली आहे.. या अधिसुचनेनुसार 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सर्किट बेंचचे कामकाज सुरू होणार आहे. यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकिलांसह नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
अनेकवेळा खंडपीठ कोल्हापूरला व्हावं यासाठी आंदोलने झाली. आता सर्किट बेंचच्या माध्यमातून ही मागणी पूर्ण झालीये. त्यामुळे कोल्हापुरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र यानिमित्ताने सर्किट बेंच म्हणजे काय, याचा नेमका काय फायदा होतो, असे काही प्रश्न अनेकांनी पडली आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊया.
(नक्की वाचा- AI Affected Jobs: AI मुळे 'या' 40 क्षेत्रातील नोकऱ्यांना धोका! तुमचा जॉब सुरक्षित आहे का? वाचा संपूर्ण यादी)
सर्किट बेंच म्हणजे काय?
हायकोर्टाची सर्किट बेंच (Circuit Bench) म्हणजे उच्च न्यायालयाचा एक तात्पुरता किंवा अस्थायी विभाग. हे खंडपीठ मुख्य न्यायालयाच्या क्षेत्राबाहेरील दूरच्या भागांमध्ये किंवा ठिकाणी खटले ऐकण्यासाठी स्थापन केले जाते. सर्किट बेंच विशिष्ट कालावधीसाठी, सहसा वर्षातून काही दिवस किंवा महिने काम करते. त्यामुळे हे नियमितपणे चालणाऱ्या कायमस्वरूपी खंडपीठासारखे नसते.
सर्किट बेंच का स्थापन करतात?
सर्किट बेंच सुरु करण्याचं मुख्य उद्दिष्ट दूरच्या किंवा दुर्गम भागातील लोकांना न्याय मिळवून देणे आणि मुख्य न्यायालयात जमा झालेल्या प्रकरणांचा निपटारा करणे हे असते. सर्किट बेंचमुळे याचिकाकर्ते आणि वकिलांना मोठ्या शहरांमधील मुख्य न्यायालयात जाण्याचा प्रवास खर्च आणि त्रास वाचतो.
(नक्की वाचा- Pune News: 'मल्हार' गडावर बेशिस्त पर्यटकांना जागरूक नागरिकाचा दणका, VIDEO पाहून अभिमान वाटेल)
सर्किट बेंच ही तात्पुरती व्यवस्था असली, तरी ज्या ठिकाणी खटल्यांची संख्या जास्त असते, अशा ठिकाणी कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करणे अधिक सामान्य असते. थोडक्यात, सर्किट बेंच ही न्यायालये लोकांच्या जवळ नेऊन न्यायप्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून काम करते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world