
Malhar Fort Tourist Video : महाराष्ट्राचा अभिमान आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र, या कर्तव्याची जाणीव नसलेल्या काही लोकांमुळे या पवित्र स्थळांचा अपमान होताना दिसतो. पुण्याजवळील प्रसिद्ध मल्हार गडावर नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे एका व्यक्तीला गड आणि किल्ल्यांचे पावित्र्य भंग केल्याबद्दल चांगलाच धडा शिकवण्यात आला.
झालं असं की, मल्हार गडावरच्या मुख्य दरवाजावर एक व्यक्ती हुक्का ओढत बसली होती. ही गोष्ट पाहून एका जागरूक नागरिकाने त्याला तसे न करण्यास सांगितले आणि गड आणि किल्ल्यांचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या व्यक्तीने त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तो तेच करत राहिला.
पाहा VIDEO
त्याच्या या वर्तणुकीमुळे संतप्त झालेल्या नागरिकाने अखेर वैतागून तो हुक्का त्याच्यासमोरच जमिनीवर आपटून फोडून टाकला. या घटनेमुळे त्या व्यक्तीला चांगलाच धडा मिळाला. आहे. त्याला आपली चूक लक्षात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्या व्यक्तीचं कौतुक केले आहे.
(नक्की वाचा - Prajakta Gaikwad: ठरलं! अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लग्नबेडीत अडकणार; पाहा खास फोटो)
या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या पावित्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेक पर्यटक अशा ठिकाणी गेल्यानंतर दारू, धूम्रपान आणि अस्वच्छता पसरवताना दिसतात. या ऐतिहासिक वास्तूंना केवळ मनोरंजनाचे ठिकाण न मानता, त्यांचा आदर राखणे आवश्यक आहे. पुरातत्व विभागाला अशा बेशिस्त लोकांसाठी कठोर नियम आणि दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world