जाहिरात

School Student Shocking News : आधी महाबळेश्वरला सहलीला गेले, पण नंतर शाळकरी मुलांसोबत घडलं भयंकर..

सोलापूरच्या शाळकरी मुलांच्या सहलीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 14 विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

School Student Shocking News : आधी महाबळेश्वरला सहलीला गेले, पण नंतर शाळकरी मुलांसोबत घडलं भयंकर..
School Trip Shocking News

विशाल पुजारी, प्रतिनिधी

सोलापूरमधून शाळकरी मुलं कोल्हापूरला सहलीसाठी गेली होती. सायंकाळी एका हॉटेलमध्ये जेवण करून बाहेर पडल्यावर या मुलांना अचानक त्रास होऊ लागला. मुलांना चक्कर आणि उलट्या झाल्या. त्यानंतर मुलांना तातडीनं सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या मुलांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याच्या कुरनूर या गावातील शाळेची सहल कोल्हापूरला गेली होती. 27 जानेवारी  रोजी मुले,मुली आणि शिक्षक अशी 80 जणांची सहल निघाली होती. सध्या 14 जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. इतर सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती शाळेच्या शिक्षकांकडून देण्यात आली आहे. मुलांना विषबाधा झाली का? हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या शाळकरी मुलांची सहल दोन दिवसांपूर्वी महाबळेश्व पाचगणी येथेही गेली होती.

कोल्हापुरात आल्यानंतर 14 विद्यार्थ्यांना अचानक त्रास

महाबळेश्वर,पाचगणी आणि इतर काही ठिकाणे फिरून ही सहल ज्योतिबा देवस्थान दर्शन घेऊन कोल्हापुरात आज (30 जानेवारी ) सकाळी पोहोचली. विद्यार्थी दुपारी चार वाजताच्या सुमारास लक्ष्मीपुरी येथील एका हॉटेलमध्ये दाखल झाले. मात्र या ठिकाणी पोहोचल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांना अचानक त्रास होऊ लागला. हॉटेल मालकाने तात्काळ या सगळ्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. 

नक्की वाचा >> गोविंदाच्या भाच्यानं घरातील गुपित उघडलं, नात्याबाबत केला मोठा खुलासा, "मामींनी मामांना चांगलंच.."

रुग्ण दाखल झाल्यानंतर अचानक वॉर्डची साफसफाई 

मुलांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करण्यात आले. 14 विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी ठेवण्यात येणार होते, परंतु त्याचवेळी रुग्णालयाची साफसफाई सुरू होती. रुग्ण दाखल करण्याच्या वेळीच वॉर्डची साफसफाई सुरु असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.

नक्की वाचा >> Gk News : फायटर जेटमध्ये पॅराशूट असतं, पण पॅसेंजर प्लेन किंवा प्रायव्हेट जेटमध्ये पॅराशूट का नसतं?

तसच  सीपीआर रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी असल्याचं उघडकीस आलं. पारगावच्या मुलांना या सरकारी रुग्णालयात शोधाशोध करावी लागली. तीन दिवस मुलं सहलीसाठी बाहेर असल्याने त्यांची तब्येत बिघडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तसच सीपीआयर रुग्णालयातील अनागोंदी कारभार पाहून पालकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com