मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अमित ठाकरे यांना माहीम, दादर, प्रभादेवी परिसराबाबतचं आपलं व्हिजन जनतेसमोर मांडला आहे. तसेच निवडून आल्यास परिसराचा कसा कायापालट करायचा याची 'ब्लू प्रिंट' त्यांना समोर आणली आहे.
नक्की वाचा - 'उद्धव ठाकरेंकडून बाण गेला फक्त खान उरले...' मालाडमध्ये 'राज'गर्जना
अमित ठाकरे यांना म्हटलं की, "मी माझी पूर्ण शक्ती लावून तुमच्या अगदी छोट्यातील छोटा प्रश्न पण सोडवायचा प्रयत्न करेन. माहिम-दादर-प्रभादेवी जे मुंबईचं हृदय आहे ते सुंदर आणि शब्दशा सगळ्यांना हेवा वाटेल इतके सुंदर करून दाखवेन. मी तुम्हाला शब्द देतो की मी कधीही राजकीय व्यभिचार करणार नाही. राजकारणाचा बाजार होऊ देणार नाही आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांचा विचार करून या मतदारसंघासाठी जे जे शक्य असेल ते करेन."
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमित ठाकरे यांना कोणत्या विषयांवर काम करण्याची इच्छा
- मच्छिमार कॉलनी इमारतीचा पुनर्विकास - कोळीवाड्यांची संस्कृती टिकण्यासाठी काम करणार, तेथील नागिरकांना हव्या असणाऱ्या विकासासाठी शासनाकडून धोरण तयार करून घेणार.
- माहिम पोलीस कॉलनी इमारतींची दुरावस्था - माहिम पोलीस कॉलनीची अतिशय बिकट परिस्थिती आहे. काही इमारतींचे स्लॅब तर काही बिल्डिंग कधीही पडू शकतात. जे पोलीस बांधव आपली सुरक्षा करतात, मला त्यांना सुरक्षित घरे मिळवून द्यायची आहेत.
- माहिममधील पाणी प्रश्न - मला हा पाणीप्रश्न मुळापासून सोडवायचा आहे आणि किमान पाणी प्रश्नासाठी लोकप्रतिनिधीकडे येण्याची गरज नागरिकांना लागू नये अशी उपाययोजना करायची आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधील मैदानाची दुरावस्था - छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या परिसरातील रहिवाशी, अनेक वर्ष मातीच्या धुळीमुळे त्यांना श्वसनाचे रोग सुद्धा जडले आहेत. येथील सर्व खेळपट्ट्या खराब झाल्या असल्याने यासंदर्भात तज्ञ लोकांनी याबाबत सुचवलेल्या अनेक उपाययोजना राबवून होतकरू खेळाडूंना चांगले पिचेस व स्थानिक नागरिकांची पण धुळीपासून मुक्तता होईल.
( नक्की वाचा : Vote Jihad : 'व्होट जिहाद'च्या आरोपांना उत्तर देताना ओवैसींना आठवले पूर्वज, म्हणाले... )
- रस्ते - नाशिकप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात खासकरून माहिममध्ये चांगल्या व उत्तम दर्जाचे रस्ते नागरिकांना देऊ शकतो.
- ड्रग्स व गर्दुल्ले - तरुणाईचे ड्रग्स सेवन व गर्दुल्ले हे रस्त्यावरती उघडपणे नशा करून महिलांना त्रास देणाऱ्यांना कायमस्वरूपी तोडगा काढून तरुणाईला ह्या वाईट सवयीपासून ड्रग्समुक्त व आईबहीणींना सुरक्षित वातावरण द्यायचे आहे.
- माहिम विधानसभा क्षेत्रात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली मध्यमवर्गीय मराठी माणसाची फसवणूक - प्रभादेवी येथील खेड गल्ली ते खाडा भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी कामगार कुटुंबांना ते राहत असलेल्या ठिकाणीच म्हाडाच्या माध्यमातून मोठी, प्रशस्त आणि नियोजित वेळेतच इमारतींचे पुनर्विकास करून, घरे उपलब्ध करून द्यायची आहेत.
- मिठी नदी - मुंबईतील आजपर्यंत मिठी नदी साफ झालेली नाही. महाराष्ट्रातील अनेक नद्यासुद्धा, ज्याचा वर्षानुवर्ष गाळ न काढल्यामुळे लोप पावत चालल्या आहेत, त्यांचे पुनर्जीवन करून अत्यंत सुंदर व देखणे सौंदर्याकरण करण्याची माझी मनापासून इच्छा आहे.
- गड किल्ले संवर्धन - महाराजांचे अनेक गड किल्ले, हे महाराष्ट्रात असून योग्य संवर्धन केले नसल्याने, त्यांची अतिशय वाईट अवस्था आहे. मला आपल्या जाणत्या राजाच्या गड किल्ल्यांचा इतिहास योग्य पद्धतीने नागरिकांना व पर्यटकांना अत्याधुनिक VR technology च्या माध्यमातून दाखवायचा आहे.
- समुद्रकिनारे - माहिमचा समुद्रकिनारा हा गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय गलिच्छ आहे. तो साफ करून तेथे चांगले सौंदर्गीकरण केल्याने पर्यटक भेट द्यायला येऊन, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.