विधानसभा निवडणुकीत 'व्होट जिहाद' हा मुद्दा तापू लागला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या या दाव्याला ऑल इंडिया मंजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमन (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी उत्तर दिलं आहे,
भाजपाचे (वैचारिक) पूर्वज ब्रिटीशांविरुद्ध लढण्याऐवजी लव्ह लेटर लिहीत होते, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली 'एक है तो सेफ है' ही घोषणा देखील देशाच्या विविधतेला धक्का देणारी आहे, अशी टीका ओवैसी यांनी केली.
( नक्की वाचा : विधानसभा निवडणुकीत AIMIM चा भाजपाला फायदा होतो का? आकडेवारीतून समजून घ्या सत्य )
ओवैसींना आठवले पूर्वज
भाजपावर टीका करताना ओवैसी म्हणाले की, 'आमच्या पूर्वजांनी ब्रिटीशांविरुद्ध जिहाद केला होता आणि आता फडणवीस आम्हाला जिहाद शिकवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्रिपणे देखील मला वादविवादामध्ये हरवू शकत नाहीत.'
फडणवीस यांनी यापूर्वी धुळे लोकसभा मतदारसंघातील निसटता पराभव 'व्होट जिहाद'मुळे झाला, त्याला धर्मयुद्धानं उत्तर द्या असं आवाहन केलं होतं. फडणवीस यांचं धर्मयुद्ध-जिहाद हे वक्तव्य निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करणारं आहे, असा दावा ओवैसी यांनी केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'व्होट जिहाद' 'धर्मयुद्ध' हे शब्द लोकशाहीत कुठून आले? तुम्ही आमदारांची खरेदी केली. आम्ही तुम्हाला चोर म्हणावं का?', असा प्रश्न हैदराबादच्या खासदारांनी यावेळी विचारला.
'आमच्या पूर्वजांनी ब्रिटीशांविरुद्ध जिहाद केला. तुमच्या नाही. फडणवीसांचे पूर्वज ब्रिटीशांना लव्हलेटर लिहीत होते आणि ते आम्हाला जिहाद शिकवणार?',या शब्दात त्यांनी भाजपाच्या विचारधारेवर हल्ला केला.
'पंतप्रधान मोदी 'एक है तो सेफ है' असं सांगत आहेत. कारण त्यांना (भाजपा) देशातील विविधता नष्ट करायची आहे. मराठा समाजाला आरक्षण न देऊन सत्ताधाऱ्यांनी त्यांची फसवणूक केली आहे, 'असं AIMIM प्रमुखांनी यावेळी सांगितलं.
( नक्की वाचा : हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्करली शरणागती? )
राज्यातील अनेक औद्योगिक प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत. पण, फडणवीस यांना ते थांबवण्याचं धैर्य नाही. त्यांना नरेंद्र मोदींची भीती वाटते का? असा प्रश्नही ओवैसींनी विचारला. प्रेषितांच्या विरोधातील वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही, असंही रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा संदर्भ देत ओवैसी यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world