जाहिरात

Prashant Koratkar : इंद्रजित सावंत यांच्यावरील शिवीगाळ प्रकरणानंतर चर्चेत आलेले प्रशांत कोरटकर कोण आहेत?

Who is DR. Prashant Koratkar : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरुन धमकी दिल्याच्या प्रकरणानंतर नागपूरचे प्रशांत कोरटकर चर्चेत आले आहेत.

Prashant Koratkar : इंद्रजित सावंत यांच्यावरील शिवीगाळ प्रकरणानंतर चर्चेत आलेले प्रशांत कोरटकर कोण आहेत?
Prashant Koratkar : अगदी चार पाच दिवसांपूर्वीपर्यंत नागपूरच्या रस्त्यावर मर्सिडिजमध्ये फिरणारे हे आहेत डॉ. प्रशांत कोरटकर सध्या फरार आहेत.
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

Who is DR. Prashant Koratkar : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरुन धमकी दिल्याच्या प्रकरणानंतर नागपूरचे प्रशांत कोरटकर चर्चेत आले आहेत. या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर देखील ट्विट करत कोरटकरांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर कोरटकर नेमके कोण? याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्याबद्दल बहुतेकांना फारशी माहिती नाही. पण,आम्ही तुम्हाला ती संपूर्ण माहिती देणार आहोत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण आहेत प्रशांत कोरटकर?

प्रशांत कोरटकर हे मुळचे माहुरचे आहेत. त्यांनी हिंगणघाट येथे शिक्षण घेतलं. चंद्रपूरमधून त्यांनी जनसंपर्क विषयात  पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी 2000 साली नागपूरमधून टीव्ही पत्रकारिता सुरु केली. वेगवेगळ्या वृत्तवाहिनीमध्ये त्यांनी काम केलंय.  त्यानंतर 'विदर्भ माझा' या यूट्यूब चॅनलचेही ते संपादक होते. समाज माध्यमांवर विशेषतः फेसबुक वर खास सक्रीय असतात. उच्च पदावरील नेते, अधिकारी यांच्याशी वैयक्तिक संबंध आहे. एका विदेशी विद्यापीठाकडून पी. एच. डी. मिळवली आहे.

( नक्की वाचा : Indrajit Sawant : रात्री 12 वा. फोन, अश्लील भाषेचा वापर, जातीवाचक शिव्या; इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्यासोबत नेमकं काय घडलं? )
 

रोहित पवारांचे आरोप काय?

कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांनीा शिवीगाळ केल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पवार यांनी याबाबत ट्विट केलंय. त्यामध्ये पवार म्हणतात, 'ज्या महेश मोतेवारने लाखो लोकांना हजारो कोटींचा गंडा घातला त्याच्या गाड्या आणि पैसे कोरटकरकडे असून महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या माजी राज्यपाल कोशारी साहेबांपासून तर केंद्र तसेच राज्य सरकारमधील मोठ्या नेत्यांसोबत कोरटकरची उठबस असल्याची माहिती समोर येत आहे, शिवाय गुवाहाटीत देखील कोरटकर हजर होता, अशी चर्चा आहे.' 

अगदी चार पाच दिवसांपूर्वीपर्यंत नागपूरच्या रस्त्यावर मर्सिडिजमध्ये फिरणारे हे आहेत डॉ. प्रशांत कोरटकर सध्या फरार आहेत. कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी नागपूरच्या गजानन नगर भागातील कोरटकरांच्या घरी पोहचले.तेव्हा कोरटकर घरी नसल्याचं त्यांना कळलं.

( नक्की वाचा : Chhaava : छावा चित्रपटावर शिर्के कुटुंबीय आक्रमक, दिग्दर्शकाला राज्यात फिरु न देण्याचा इशारा )
 

थोडक्यात काय प्रसिद्धी माध्यमात काम केल्यानं कशामुळे प्रसिद्धी मिळते आणि कशामुळे नाचक्की होते याची पूर्ण कल्पना असणाऱ्या कोरटकरांनी नसती उठाठेव केली आणि पोलीस त्यांच्या मागावर आहेत.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: