जाहिरात

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर कुणाच्या मदतीने तेलंगणात पोहोचला? 5 जणांना नोटीस

प्रशांत कोरटकरला लपण्यासाठी आणि चंद्रपूर येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यादरम्यान तसेच तेलंगणा येथे पळून जाताना मदत केल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे.

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर कुणाच्या मदतीने तेलंगणात पोहोचला? 5 जणांना नोटीस

संजय तिवारी, नागपूर

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकर याला मदत केल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांना नोटीस बजावली आहे. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. प्रशांत कोरटकर याच्या प्रकरणात तपास करताना कोल्हापूर पोलिसांना कोणते दुवे हाती लागले त्याची माहिती आता समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांना तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकर याला बेपत्ता असताना मदत केल्याची माहिती मिळाल्याने पाच जणांना कोल्हापूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यामध्ये प्रशांत कोरटकर याचा सहकारी प्रशिक पडवेकर, चंद्रपूर येथील धीरज चौधरी, इंदौर येथील हिफाजत अली आणि राजेंद्र जोशी तसेच आणि साईराज पेंटकर नावाचा आणखी एक व्यक्ती, अशी नोटीस बजावलेल्या पाच जणांची नावे आहेत.

(नक्की वाचा- Solapur News : विमानाने यायचा, चोरी करुन निघून जायचा; कोट्यधीश चोरट्याला सोलापुरात बेड्या)

या सर्वांना कोरटकरला लपण्यासाठी आणि चंद्रपूर येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यादरम्यान तसेच तेलंगणा येथे पळून जाताना मदत केल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे. या सर्वांनी त्याला चंद्रपुरात हॉटेलमध्ये वास्तव्यादरम्यान मदत तर केली. याशिवाय त्याला तेलंगणामध्ये पळून जाण्यासाठी कारची व्यवस्था करणे, पैसे पुरवणे आणि अन्य मदत केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. 

याशिवाय, एका पोलिस अधिकाऱ्याने देखील वैयक्तिक स्वरूपात त्याला मदत केल्याचे पुढे आले आहे. या पोलिस अधिकाऱ्याची खाजगी कार त्याने वापरल्याचे समोर आले आहे. कोरटकर याने त्याला कोणते आमिष दिले होते याची चौकशी सुरू आहे.

(नक्की वाचा - अपहरणापूर्वी देशमुखांनी चालकाला केलं होतं अलर्ट, शेवटचं वाक्य काय होतं? NDTV मराठीच्या हाती महत्त्वाचा जबाब )

नागपुरातून कोरटकर याची कार आणि त्याचा मित्र धीरज चौधरी यांची कारसुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. या वाहनांचा उपयोग लपून वावरण्यासाठी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: