जाहिरात

वेळ आली होती पण..., नदीच्या पुरात 'ती' अडकली, त्या दोघांनी कमाल करून दाखवली

त्यांचे न ऐकता महिला खाली उतरली. नदी पात्रात ती गेली. थोड्या वेळानंतर एक माणूस गांधारी परिसरातील असलेल्या वाहतूक पोलिस चौकीत आला.

वेळ आली होती पण..., नदीच्या पुरात 'ती' अडकली, त्या दोघांनी कमाल करून दाखवली
कल्याण:

अमजद खान 

उल्हास नदीवर फूले टाकण्यासाठी आलेली महिला दिसत नाही. हे ऐकताच पोलिस कर्मचाऱ्लयाने आपल्या ट्रॅफिक वार्डनसोबत नदीत उडी मारली. साडी दिसली. साडीला खेचताच महिलेचा हात पोलिस कर्मचाऱ्याच्या हाती आला. तिला बाहेर काढण्यात आले. तिचा श्वास सुरु होता. रस्त्यावर आणल्यावर तिच्या पोटातील पाणी काढण्यात आले. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिला सुखरुप आहे महिलेच्या कुटुंबियांना धाडसी पोलिस कर्मचारी मच्छींद्र चव्हाण आणि पोलिस वार्डनचे आभार मानले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरातील ऋतू रिव्हरव्हूय क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या सुनंदा बोरसे या  फुले टाकण्यासाठी नदीजवळ आल्या होत्या. लोकांनी त्यावेळी तिला सांगितले की,नदीला पूर आला आहे. पाण्याची पातळी वाढली आहे. खाली जाऊ नका. त्यांचे न ऐकता महिला खाली उतरली. नदी पात्रात ती गेली. थोड्या वेळानंतर एक माणूस गांधारी परिसरातील असलेल्या वाहतूक पोलिस चौकीत आला. 

ट्रेंडिंग बातमी - पापाचा घडा कोणाचा भरला? शिंदेंचे ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर

तेथील पोलिस कर्मचारी मच्छींद्र चव्हाण यांना सांगितले की, जी महिला नदीत फूले टाकण्यासाठी गेली होती. ती दिसत नाही. पोलिस कर्मचारी मच्छींद्र चव्हाण आणि सहकर्मी वार्डन संजय जायस्वार हे दोघे नदी पात्राच्या दिशेने गेले. त्याठिकाणी जाताच त्याना एक पिवळया रंगाची साडी दिसली. चव्हाण यांनी जसा साडीला हात लावला. त्या महिलेचा हात चव्हाण यांच्या हाती आली. चव्हाण यांनी महिलेस पाण्यातून बाहरे काढले. महिला पाण्यातील गाळात अडकल्याने ती प्रवाहात वाहून गेली नाही. तिला बाहेर काढल्यानंतर तिचा श्वास सुरु होता. 

ट्रेंडिंग बातमी -  मविआत मोठा भाऊ कोण? पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदाच थेट बोलले

तिच्या पोटातील पाणी पोलिस कर्मचारीसह वार्डनने काढले. तिला त्वरीत जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. तिच्यावर उपचार करण्यात आले.ती महिला बचावली आहे. ती आता सुखरुप आहे. याची माहिती तिच्या घरच्या कुटुंबियांना देण्यात आली. कुटुंबीय देखील त्याठिकाणी पोहचले. महिलेच्या कुटुंबियांनी पोलिस कर्मचारी मच्छींद्र चव्हाण आणि वार्डनचे आभार मानले. धाडसा पोलिस कर्मचारी मच्छींद्र चव्हाणसह वार्डन संजय जायस्वार यांनी प्रसंगावधान राखत जे धाडस दाखवले त्याचे कौतूक होत आहे. शिवाय एका महिलेचेही त्यामुळे प्राण वाचले. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Walk : अतिरिक्त चरबी अन् आजारांना म्हणा बाय बाय, 30 दिवसांचा प्रभावी Walking Plan!
वेळ आली होती पण..., नदीच्या पुरात 'ती' अडकली, त्या दोघांनी कमाल करून दाखवली
CIDCO Navi mumbai  Lottery CIDCO New Lottery Announcement, Why Buy a CIDCO Home
Next Article
सिडकोचेच घर का खरेदी कराल? नव्या लॉटरीत 'ही' आहे खास गोष्ट