
Jaweb Habib Crime News : प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचं नाव एका गंभीर प्रकरणात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. क्रिप्टो फ्रॉड केसमध्ये जावेद हबीबचं नाव जोडलं गेलं आहे.उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील पोलिसांच्या टीमने बुधवारी जावेदच्या घरी छापा टाकला. पण पोलिसांना जावेद घरी सापडला नाही.पोलिसांच्या माहितीनुसार, जावेद इंटरोगेशनपासून स्वत:चा बचाव करत आहे आणि तो सध्या फरार आहे. पोलीस तपासात सहकार्य करण्याचा आदेश जावेदला देण्यात आला आहे.
कोट्यावधी रुपयांची फसवणूक, 32 गुन्हे दाखल
रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, हबीबवर जवळपास 5 ते 7 कोटी रुपयांच्या इन्वेस्टमेंट स्कॅमचा आरोप करण्यात आला आहे. आतापर्यंत जावेद विरोधात 32 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी त्याचा मुलगा अनस आणि एक पार्टनर सैफुलचंही नाव समोर आलं आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, या लोकांनी हाय रिटर्न्सच्या लोभापोटी लोकांकडून पैसै घेतले. पण निश्चित काळानंतरही गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत.
नक्की वाचा >> रणवीर सिंग की दीपिका पादुकोण? कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? Net worth चा आकडा वाचून डोळे विस्फारतील
काय आहे जावेद हबीबचं फसवणुकीचं प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हबीब आणि त्याच्या साथीदारांनी एफएलसी (Follicle Global Company) नावाच्या एक फेक स्किमच्या माध्यमातून लोकांनी गुंतवणूक केलीय. या स्कीमच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून 5 ते 7 लाख रुपये घेण्यात आले. त्यांना बिटकॉन (Bitcoin) आणि बायनान्स (Binance Coin) कॉईनमध्ये 50 टक्क्यांपासून ते 70 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळणार. 2023 मध्ये संभलच्य रॉयल पॅलेस वेंकेट हॉलमध्ये एक इव्हेंटही झालं होतं. ज्यामध्ये या स्कीमला प्रमोट करण्यात आलं होतं.
पोलिसांच्या माहितीनुसार,जवळपास 150 लोकांनी या स्कीममध्ये गुंतवणूक केली. पण अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर कोणालाच रिटर्न्स मिळालं नाही. संभल पोलिसांनी म्हटलंय की,एकूण 5 ते 7 कोटींची फसवणूक झाली आहे. यामुळे जावेद हबीब आणि त्यांचे कुटुंबीय, मुलाविरोधात लुकआऊट नोटिस जारी करण्यात आली आहे. जेणेकरून तो देश सोडून फरार होऊ नये.
नक्की वाचा >> ग्राहकांनो, आता पैशांची होईल मोठी बचत! कशी कराल दिवाळीची शॉपिंग? Online की Offline? वाचा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world