जाहिरात

नियमभंग, असभ्य वर्तन, सामान अडवलं… पुण्यात रात्रीच्या वेळी लेखिकेला Uber चालकाचा भयानक अनुभव

Pune News: भाडे दिल्याशिवाय सामान देण्यास गौतमने स्पष्ट नकार दिला. त्याचवेळी चिन्मय मिशनचे काही कर्मचारी मदतीसाठी बाहेर आले. त्यांनी चालकाला सामान देऊन पैसे घेण्यास सांगितले, पण गौतम त्यांच्यावरही ओरडला

नियमभंग, असभ्य वर्तन, सामान अडवलं… पुण्यात रात्रीच्या वेळी लेखिकेला Uber चालकाचा भयानक अनुभव
प्रतिकात्मक फोटो

लेखिका आणि मानुषी मासिकाच्या संस्थापक संपादक, माजी प्राध्यापक मधु पूर्णिमा किश्वर (Madhu Purnima Kishwar) यांनी उबर कॅब चालकासोबतचा भयानक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. मधु किश्वर यांना  पुणे विमानतळावरून चिन्मय विभूती सेंटरपर्यंतच्या प्रवासात विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. चालकाने गैरवर्तन केले, तसेत प्रवासाचे पैसे देण्यापूर्वी त्यांचे सामान देण्यासही नकार दिला. 

प्रवासादरम्यान चालकाचे दुर्लक्ष

मधु पूर्णिमा किश्वर यांनी सोशल मीडिया एक्सवर व्यक्त होत म्हटलं की, बुधवारी रात्री 8.35 वाजता मधु किश्वर यांनी पुणे विमानतळावरून चिन्मय विभूती सेंटरसाठी सुमारे 52 किलोमीटरचा प्रवासासाठी एक इंटरसिटी राईड बुक केली होती. किश्वर यांनी सांगितले की, चालक गौतम हा प्रवासादरम्यान बराच वेळ अतिशय रागात फोनवर बोलल होता. राईडबद्दल कोणताही प्रश्न विचारला तरी त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याने स्वतःहून त्याला त्रास दिला नाही, पण उबरच्या नियमांनुसार ड्रायव्हरला इतका वेळ फोनवर बोलण्यास मनाई आहे.

Dear @Uber_India I had the most nightmarish experience with Uber driver GAUTAM tonight.
I booked an intercity ride at 835 pm from Pune airport for Chinmaya Vibhooti Centre which is about 52 kms from the airport.
It was a long ride. Driver Gautam remained so busy talking in an… pic.twitter.com/zrQNGIyh13

— Madhu Purnima Kishwar (@madhukishwar) November 30, 2025

(नक्की वाचा- Holiday in Maharashtra: महाराष्ट्रात 2 डिसेंबरला पगारी सुट्टी; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

चालकाची नौटंकी, विनंतीला नकार

रात्री 10.30 च्या सुमारास त्या चिन्मय मिशन सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यावर चालकाने उद्धटपणे सांगितले की, त्याचे काम फक्त मुख्य गेटपर्यंत सोडणे आहे. पुढे तुम्हाला स्वतः जावं लागेल. किश्वर यांनी आपल्याजवळ एक सुटकेस आणि बॅकपॅक असल्याचे आणि कॅम्पस खूप मोठा असल्याने त्यांना सुरक्षा रक्षकाने सुचवलेल्या ठिकाणी सोडावे, अशी विनंती केली. तरीही चालकाने रागाने नकार दिला, असंही मधु यांनी सांगितलं.

कॅम्पसमध्ये त्यांच्या खोलीची चावी मिळाल्यावर, त्यांची इमारत केवळ 100 मीटर अंतरावर असल्याचे कळले. तेव्हा गौतम पुन्हा मोठ्याने ओरडू लागला आणि म्हणाला की, त्याला आणखी वेळ वाया घालवायचा नाही. किश्वर यांनी विनंती केली, पण त्याचे वर्तन असभ्य होते.

सामान घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न

भाडे दिल्याशिवाय सामान देण्यास गौतमने स्पष्ट नकार दिला. त्याचवेळी चिन्मय मिशनचे काही कर्मचारी मदतीसाठी बाहेर आले. त्यांनी चालकाला सामान देऊन पैसे घेण्यास सांगितले, पण गौतम त्यांच्यावरही ओरडला. यानंतर गौतमने त्यांचे सामान डिक्कीतच ठेवून पैसे न दिल्याची खोटी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला जात असल्याचे सांगून गाडी पळवली. मिशनच्या एका कर्मचाऱ्याने त्वरित मुख्य गेटवरील सुरक्षा रक्षकांना फोन करून कॅबला कॅम्पसबाहेर जाऊ न देण्यास सांगितलं. त्यानंतर गौतमने किश्वर यांना फोन करून धमकीच्या सुरात पैसे देण्याबद्दल विचारले.

(नक्की वाचा-  Mumbai News : पुण्यानंतर मुंबईतही बिबट्या? प्रसिद्ध उद्यानाच्या सीमाभागात वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून गस्त )

पैसे दिल्यावर सुटका

किश्वर यांना निमंत्रित केलेल्यांनी चालकाला त्वरित परत येण्यास सांगितले. गौतम परतला, पण पुन्हा पैसे मिळाल्यावरच सामान बाहेर काढण्याचा हट्ट धरला. अखेरीस किश्वर यांनी कॅबमध्ये बसून 1693 रुपयांचे बिल 1700 रुपये देऊन चुकवले, त्यानंतर त्यांना त्यांचे सामान मिळाले.

उबरला मानसिक आरोग्याचा सल्ला

या धक्कादायक घटनेनंतर किश्वर यांनी उबर इंडिया आणि उबर सपोर्टला टॅग करून लिहिले की, जर त्यांना मदत करण्यासाठी चिन्मय मिशनचे लोक उपस्थित नसते, तर काय झाले असते? रस्त्याचा मोठा भाग निर्जन आणि अंधारमय होता. त्यांनी गौतमच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेत तो उबरसाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतो, असंही म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com