जाहिरात

Youtuber Mahi Khan Controversy: माही खानची पुरती तंतरली! मनसेच्या इशाऱ्यानंतर काही तासात मागितली माफी

अविनाश जाधव यांच्या तीव्र भूमिकेनंतर आणि कारवाईच्या इशाऱ्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत माही खान या तरुणाने सोशल मीडियावर एक माफीनामा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Youtuber Mahi Khan Controversy: माही खानची पुरती तंतरली! मनसेच्या इशाऱ्यानंतर काही तासात मागितली माफी

रिझवान शेख, ठाणे

YouTuber Mahi Khan Controversy: एअर इंडियाच्या विमानात झालेल्या एका क्षुल्लक वादामुळे मुग्धा मजुमदार या महिलेला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. मूळच्या बंगाली असलेल्या, पण मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या मुग्धा मजुमदार या महिलेला युट्युबर माही खान याने सोशल मीडियावर लक्ष्य केले होते. या प्रकरणानंतर या महिलेला नोकरी सोडावी लागली, तसेच त्यांना फोनवर सतत धमक्या आणि शिवीगाळ सहन करावी लागली. केवळ मराठी बोलण्यावरून हा वाद झाला होता. मात्र मनसेने मुग्धा यांची बाजू घेत माही खानला धडा शिकवण्याच इशारा दिला होता. यानंतर अखेर माही खाने व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे.

अविनाश जाधव यांच्या तीव्र भूमिकेनंतर आणि कारवाईच्या इशाऱ्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत माही खान या तरुणाने सोशल मीडियावर एक माफीनामा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सदरचा तरुण म्हणत आहे की, "तीन दिवसांपूर्वी मी जो व्हिडीओ टाकला होता, तो मी काढून टाकला आहे. व्हिडीओ शेअर करताना कुणाला नुकसान व्हावं असा माझा कोणताही हेतू नव्हता. मराठी भाषा, मराठी संस्कृती कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मला जे कुणी एकतंय त्यांना मी सांगू इच्छितो की मी कोणत्याही भाषेविरोधात नाही. माझा व्हिडीओमुळे कुणाला वाईट वाटलं असेल तर मी त्या सर्वांची माफी मागतो. मी मुंबई येत-जात असतो. मुंबई माझी जना आहे. मी हक्काने बोलतो, जय महाराष्ट्र."

(नक्की वाचा-  Viral Video: मराठीचा आग्रह धरणाऱ्या महिलेची नोकरी गेली, माही खानला कोंबडा करणार; मनसे नेत्याने घेतली शपथ)

काय आहे नेमके प्रकरण?

विमानात मुग्धा मजुमदार चहा पीत असताना, पुढच्या सीटवर बसलेल्या माही खानने अचानक सीटचे बॅकरेस्ट मागे घेतले, ज्यामुळे महिलेच्या अंगावर पुढ्यात ठेवलेले जेवण सांडले. मजुमदार यांनी माही खानला "भाऊ जरा हळू" असे मराठीत म्हटल्यावर, माही खानला याचा राग आला आणि त्याने महिलेशी वाद घालण्यास सुरुवात केली. माही खानने या वादाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला, ज्यात महिलेला मराठी बोलल्याबद्दल लक्ष्य केले गेले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुग्धा मजुमदार यांना खूप त्रास सहन करावा लागला. ह्युंदाई कंपनीतील त्यांची नोकरी गेली. इतकेच नाही, तर त्यांना फोनवरून वाईटसाईट बोलले गेले आणि बलात्काराच्या धमक्या देखील देण्यात आल्या.

(नक्की वाचा-  Solapur Political News: राष्ट्रवादीचे हे 3 आमदार शरद पवारांची साथ सोडणार? चर्चांना उधाण)

मनसे नेते अविनाश जाधव यांचा दणका

पीडित महिला मुग्धा मजुमदार यांनी ठाण्यात मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आणि माही खानविरुद्ध तक्रार केली. अविनाश जाधव यांनी माही खान केवळ व्ह्यूज वाढवण्यासाठी हे सगळं करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जाधव यांनी जाहीरपणे बजावले होते की, "माही खान याला आम्ही शोधून काढत मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनवू,. तसेच त्याला मराठी बोलायला लावणारच, असा शब्द त्यांनी दिला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासांत युट्युबर माही खानने माघार घेत माफीनामा जाहीर केला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com