जाहिरात

Asia Cup 2025: 6,6,6... बॉलिंगवर सलग 5 सिक्स, वडिलांचे हार्ट अटॅकने निधन; श्रीलंकन खेळाडूवर दुःखाचा डोंगर

Asia cup 2025 AFG Vs SL: आशिया चषक स्पर्धेतील आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या या खेळाडूसोबत घडलेल्या या घटनेने क्रिडा विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. 

Asia Cup 2025: 6,6,6... बॉलिंगवर सलग 5 सिक्स, वडिलांचे हार्ट अटॅकने निधन; श्रीलंकन खेळाडूवर दुःखाचा डोंगर

SL vs AFG Asia Cup 2025: आशिया खंडात खेळणारा श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज दुनिथ वेल्लालगे याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरु असतानाच त्याच्या वडिलांचे हार्ट अटॅकने निधन झाले. आशिया चषक स्पर्धेतील आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या या खेळाडूसोबत घडलेल्या या घटनेने क्रिडा विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. 

१८ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे झालेल्या आशिया कप ग्रुप बी सामन्यात श्रीलंका संघाने अफगाणिस्तानवर (Sri Lanka Vs Afghanistan) सहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. सामन्यामध्ये अफगाणिस्तानने ८ बाद १६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेने १८.४ षटकांत ४ विकेटने लक्ष्य गाठले. हा संघाचा सलग तिसरा विजय होता आणि अफगाणिस्तान आशिया कपमधून बाहेर पडला तर बांगलादेशला सुपर ४ मध्ये स्थान मिळाले.

हा सामना सुरु असतानाच २२ वर्षीय फिरकी गोलंदाज  दुनिथ वेल्लालगे (dunith wellalage) याचे वडिल सुरंगा वेल्लालगे यांचे निधन झाले. गुरुवारचा सामना वेलागेचा पाचवा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता आणि २०२५ च्या आशिया कपमधील त्याचा पहिलाच सामना होता. त्याला या सामन्यात चमकदार गोलंदाजी करता आली नाही.  कर्णधाराने त्याला अफगाणिस्तानविरुद्ध डावातील शेवटचा षटकार टाकण्याचे काम दिले. या षटकात मोहम्मद नबीने त्याला तब्बल पाच षटकार मारले. पहिल्या तीन चेंडूंवर षटकार मारल्यानंतर, चौथा चेंडू नो-बॉल होता. त्यानंतर नबीने पुढच्या दोन चेंडूंवर पुन्हा दोन सिक्स षटकार मारले.

मात्र हा सामना श्रीलंकेने मोठ्या फरकाने जिंकला. आशिया कपमध्ये श्रीलंकेने सलग तिसऱ्या विजयाचा जल्लोष करत असतानाच ही दुःखद बातमी समोर आली आहे. सामन्यानंतरच्या औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर श्रीलंकेच्या संघ व्यवस्थापकाने त्याला ही दुःखद बातमी कळवली. त्यानंतर तातडीने तो मायदेशी परतला. दरम्यान,  वडिलांच्या निधनामुळे वेलागेच्या स्पर्धेतील सहभागाबाबत अनिश्चितता आहे. श्रीलंकेचा सामना २० सप्टेंबर रोजी बांगलादेश, २३ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि २६ सप्टेंबर रोजी भारताशी होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com