
चॅम्पियन ट्रॉफी सध्या पाकिस्तानमध्ये होत आहे. या स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड यांच्यातील सामना लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात स्पर्धेच्या पाकिस्तानी आयोजकांकडून एक मोठी गडबड झाली. दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरले. त्याच वेळी आयोजकांनी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीता ऐवजी भारताचं राष्ट्रगीत लावलं गेलं. मात्र ही चुक त्यांच्या लक्षात आली. त्यांनी ती तात्काळ सुधारली. पण तो पर्यंत बराच वेळ झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड हा चॅम्पियन ट्रॉफीचा चौथा सामना लाहोर इथं होत आहे. ही स्पर्धा पाकिस्तानात होत आहे. मात्र भारताचा संघ पाकिस्तानात खेळणार नाही. भारताचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. अशा स्थितीत आयोजकांकडून झालेली ही चुक मोठी समजली पाहीजे. शिवाय अनेक गोष्टींचा विचार करायला ही चुक भाग पाडत आहे. जो व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे त्यात ऑस्ट्रेलियाची टीम मैदानात राष्ट्रगीतासाठी तयार आहे.
त्याच वेळी भारताचे राष्ट्रगीत लावले जाते. काही क्षणासाठी सर्वच जण आवाक होतात. याचं लाईव्ह टेलिकास्ट संपुर्ण जगात होत होतं. आयोजकांकडून चुक झाली आहे हे लगेचच लक्षात आलं. काही वेळ भारताचे राष्ट्रगीत वाजले. नंतर ते बंद करण्यात आले. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत लावण्यात आले. पाकिस्तानकडून झालेल्या या चुकीनंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अनेकांनी तर सोशील मीडियावरून पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.
सोशल मीडियावर यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तान हा शेवटी अखंड भारताचाच हिस्सा आहे असं एकाने म्हटलं आहे. त्यामुळे सत्य हे बाहेर येतच. तर एकाने दुश्मन देशाचा हिंदू जागा झाला अशी प्रतिक्रीया नोंदवली आहे. दरम्यान याच स्टेडिअमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड हा महत्वाचा सामना रंगत आहे. पुढच्या फेरीत जाण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा मानला जात आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरूवात केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world