
लॉर्ड्स कसोटी सामना जिंकण्याची भारताला सुवर्णसंधी आहे. टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा डाव 192 धावांत गडगडला. त्यामुळे भारताला विजयासाठी 193 धावांची गरज आहे. शिवाय पाचव्या दिवसाचा खेळ अजून शिल्लक आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकी समोर नांदी टाकली. वॉशिंग्टनने सुंदर बॉलिंग करत 12 ओव्हर्समध्ये 4 विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने जो रुट, बेन स्टोक, जेम स्मिथ या आघाडीच्या फलंदाजांना क्लिन बोल्ड केले. त्यामुळे इंग्लंडचा डाव 192 धावांत आटोपला.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारताने पहिल्या सत्रात इंग्लंडला एका पाठोपाठ चार धक्के दिले. महम्मद सिराजने अप्रतिम स्पेल टाक दोन फलंदाजाना बाद केले. त्याने बेन डकेत आणि ओली पोप यांना आऊट केले. तर सलामिविर झेकला नितीशकुमार रेड्डीने माघारी धाडले. त्यानंतर जो रुट आणि हॅरी ब्रुक यांची चांगली भागिदारी झाली होती. त्याच वेळी आकाश दीपने हॅरी ब्रुकला क्लिनबोल्ड करत इंग्लंडवर दबाव टाकला.
IND vs ENG: शुबमन गिल अंपायरवर चिडला, गावस्करही संतापले! लॉर्ड्स टेस्टमध्ये भर मैदानात मोठा राडा
जो रुट आणि कॅप्टन बेन स्टोक यांची जोडी चांगली जमली होती. त्यावेळी कॅप्टन शुबमन गिलने वॉशिंग्टन सुंदरला बॉलिंगसाठी बोलवले. त्याने ही आपल्या कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला. आधी त्याने जो रुट मग बेन स्टोकला क्लिन बोल्ट केले. त्यानंतर आलेल्या जेम स्मिथ यालाही जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहू दिले नाही. त्याला ही त्याने बोल्ड केले. बुमरानेही मग तळाच्या दोन फलंदाजांना आऊट करत इंग्लंडचा डाव गुंडाळला. इंग्लंडला 192 धावा करता आल्या. आता भारताला विजयासाठी 193 धावांची गरज आहे.
नक्की वाचा - IND Vs ENG: शेवटच्या ओव्हरमध्ये हायहोल्टेज ड्रामा! शुभमन गिल थेट भिडला, पाहा VIDEO
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिक खेळली जाणार आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकला. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने कम बॅक करत इंग्लंडला धुळ चारली. त्यामुळे ही कसोटी मालिक एक एक अशी बरोबरीत आहे. तिसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची संधी भारताकडे आहे. त्यामुळे भारताचे फलंदाज आता कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world