
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामना रोमांचक मोडवर पोहचला आहे. ओव्हल कसोटी सामना जिंकण्याची आता इंग्लंड आणि भारत या दोघांनाही संधी आहे. चौथ्या दिवसाचा खेळ खराब लाईटमुळे थांबवण्यात आला. त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची गरज होती. तर भारताला चार विकेट्स विजयासाठी हव्या आहेत. ज्यावेळी खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडचा स्कोर 339 वर 6 विकेट्स असा होता. दरम्यान चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर इंग्लंडच्या बेन डकेट आणि ऑली पोप यांना लवकर आऊट करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. मात्र त्यानंतर ज्यो रूट आणि हॅरी ब्रुक यांनी इंग्लंडला विजयाच्या जवळ नेले. हॅरी ब्रुक यांने तर आपले शतक पूर्ण केले. त्या पाठोपाठ जो रूटनेही शतक केले. हे दोघेही बाद झाल्यानंतर मात्र मॅचमध्ये एक रोमांच निर्माण झाला होता. जो रुटला 105 धावांवर प्रसिद्ध कृष्णाने बाद केलं. त्यानंतर जेकब बेथेल ही पाच धावांवर बाद झाला. त्यामुळे सामन्याला अचानक कलाटणी मिळाल्याची स्थिती निर्माण झाली. भारतीय बॉलर्सनी जोरदार गोलंदाजी केली. त्यामुळे तळाच्या फलंदाजांना खेळताना अडचण निर्माण होत होती. मात्र शेवटी खराब प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची गरज होती.तर भारताल विजयासाठी चार विकेट हव्या होत्या. त्यामुळे हा कसोटी सामना कोण जिंकणार याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. पाचव्या दिवशी या सामन्याचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतीय बॉलर्सना नवा बॉल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्याचा ते कितपत फायदा उचलतात ते पाहावं लागणार आहे.
Jasprit Bumrah : आशिया कपपूर्वी टीम इंडियाला धक्का! जसप्रीत बुमराह आऊट, कारण काय?
भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल क्रिकेट ग्राउंडवर पाचवा सामना पार पडला. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने त्यांच्या दुसऱ्या डावात एक विकेट गमावून 50 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी हा सामना भारत जिंकणार की इंग्लंड याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने सलामीवीर जॅक क्रॉलीला बाद केले. त्यामुळे या सामन्यात रोमाचं निर्माण झालं होतं. क्रॉलीला 14 धावा केलं होतं. इंग्लंडला हा कसोटी सामना जिंकण्यासाठी चौथ्या दिवशी 324 धावा करायच्या होत्या. त्यांच्या हातात नऊ विकेट शिल्लक ही होत्या. ही मालिका बरोबरीत आणण्यासाठी टीम इंडियाला सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडला 324 धावांच्या आत गुंडाळण्याचे आव्हान होते.
IND Vs ENG: ओव्हल टेस्टमध्ये राडा! के एल राहुल थेट पंचांना नडला; पाहा VIDEO
यशस्वी जयस्वालने ओव्हल कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शानदार शतक ठोकले होते. त्याने 118 धावांची शानदार खेळी केली. या कसोटी मालिकेतील हे त्याचे दुसरे शतक आहे. याशिवाय रवींद्र जडेजाने 66 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने 53 धावांची वेगवान खेळी केली. ज्याच्या मदतीने टीम इंडियाने दुसऱ्या डावात 396 धावा केल्या. अशाप्रकारे टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जोश टोंगने सर्वाधिक 5 बळी घेतले. गस अॅटकिन्सनने तीन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जेमी ओव्हरटनने दोन बळी घेतले. ओव्हल मैदानावर इतके मोठं लक्ष या आधी कोणत्याच संघाने दिले नव्हते. त्याचा यशस्वी पाठलाग इंग्लंडने केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world