जाहिरात

IND Vs PAK: महाशिवरात्री, पाकिस्तानचा धुव्वा अन् विचित्र योगायोग! करोडो भारतीयांचं टेन्शन वाढलं

पाकिस्तानला हरवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानला सहज हरवले होते. 

IND Vs PAK: महाशिवरात्री, पाकिस्तानचा धुव्वा अन् विचित्र योगायोग! करोडो भारतीयांचं टेन्शन वाढलं

T20 WC India Vs Pakistan Match:  टी२० २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला ग्रुप स्टेजमध्ये हरवून सुपर ८ मध्ये प्रवेश केला. रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 61 धावांनी दणदणीत पराभव केला. पाकिस्तानच्या फ्लॉप कामगिरीमुळे भारतीय संघाचा हा शानदार विजय निश्चितच मानला जात होता. या विजयासोबतच भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्याकडे घौडदौड सुरु ठेवली आहे. मात्र पाकिस्तानचा धुव्वा उडवणे हा टीम इंडियासाठी अशुभ संकेत मानला जात असून जुन्या आकडेवारीने टेन्शन चांगलेच वाढले आहे. 

एक योगायोग अन् भारतीयांचे टेन्शन वाढले...

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपले जेतेपद राखण्यासाठी एक मजबूत दावेदार असल्याचे दिसून येते. पण अचानक, एक योगायोग घडताना दिसतो ज्यामुळे काही करोडो भारतीयांचे टेन्शन वाढलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या विजयाचे कारण काय आहे. हा योगायोग आहे का आणि त्याचा पाकिस्तानशी काय संबंध आहे? जाणून घेऊया. 

T20 World Cup दरम्यान व्हायरल होणारी ही सुंदरी कोण? AI की...; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

भारत विरुद्ध पाकिस्तान, महाशिवरात्री आणि १५ फेब्रुवारी…

 भारत-पाकिस्तान सामना रविवार, १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने सहज विजय मिळवला. तत्पुर्वी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानला हरवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानला सहज हरवले होते. 

इतकेच नाही तर त्यावेळीही रविवारी देशभरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. टीम इंडियाने या निमित्ताने शिवभक्तांसह संपूर्ण देशाला एक अद्भुत भेट दिली. पण यामुळे आपल्याला २२ वर्षे जुन्या सामन्याची आठवण झाली. यापूर्वी २००३ मध्ये महाशिवरात्रीला भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला होता आणि तेव्हाही टीम इंडिया जिंकली होती.

दोन्हीवेळा पराभव..

येथेच संपूर्ण योगायोग आहे. २०१५ च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून हरली आणि शेवटी विश्वविजेती बनली. त्याआधी, २००३ च्या विश्वचषकातही टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आणि विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. या वर्षी १५ फेब्रुवारी आणि महाशिवरात्री एकाच दिवशी आली आणि टीम इंडियाने पाकिस्तानला टी२० विश्वचषकात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फरकाने हरवले. तर, टीम इंडिया पुन्हा एकदा विजेतेपदाशिवाय परतेल का? की यावेळी कॅप्टन सूर्याचा संघ इतिहास बदलेल? अशी चिंता आता क्रिकेटप्रेमींना वाटू लागली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com