जाहिरात

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक महाविक्रम रचण्याची ईशान किशनला संधी, जाणून घ्या आतली बातमी

ईशान किशन आज सलामीला येत कशी फटकेबाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक महाविक्रम रचण्याची ईशान किशनला संधी, जाणून घ्या आतली बातमी
  • टी-20 विश्वचषकातील सुपर-8 फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अहमदाबादमध्ये सामना होणार आहे
  • दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित असून संध्याकाळी सात वाजता हा हाय-व्होल्टेज सामना खेळला जाणार आहे
  • भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन आजच्या सामन्यात 300 षटकार पूर्ण करतो का याकडे लक्ष आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

T20 World cup 2026, IND vs SA: सुपर-8 मधील हाय-व्होल्टेज लढत आज होत आहे.  टी-20 विश्वचषकातली ही लढत भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन बलाढ्य संघात होणार आहे. हे दोन्ही संघ आज आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता हा सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित राहिले आहेत. श्रीलंकेतील सामन्यांप्रमाणे येथे पावसाचे सावट नसल्याने चाहत्यांना पूर्ण खेळाचा आनंद घेता येईल. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याच्याकडे वैयक्तिक कामगिरीत इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

ईशान किशनने आजच्या सामन्यात केवळ 1 षटकार लगावला तर तो टी-20 क्रिकेटमध्ये (सर्व फॉरमॅट्स मिळून) 300 षटकार पूर्ण करेल. तसेच, त्याने जर 4 षटकार ठोकले तर यष्टीरक्षक म्हणून टी-20 मध्ये 200 षटकार पूर्ण करणारा तो खास खेळाडू ठरेल. याशिवाय, भारतामध्ये खेळताना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ 41 धावांची गरज आहे.

नक्की वाचा - Trending News: 5 दिवसात 4 राज्य फिरला, ब्रिटीश युट्यूबर भारताबाबत थेट बोलला, म्हणाला खरा चेहरा...

ईशानने आतापर्यंत 40 टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 30.43 च्या सरासरीने 1187 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश असून त्याचा स्ट्राईक रेट 144.75 इतका प्रभावी आहे. त्याने आतापर्यंत 120 चौकार आणि 63 षटकार ठोकले आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. संघात अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांसारख्या मॅचविनर खेळाडूंचा भरणा आहे. ईशान किशन आज सलामीला येत कशी फटकेबाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नक्की वाचा - Trending News:10 लाखांची नोकरी सोडून जर्मनी गाठले!, भारतीय तरुणीने असं पाऊल का उचलले? कारण ऐकून हैराण व्हाल

भारत: सुयकुमार यादव (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, संजू सैमसन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, वाशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह

साउथ आफ्रीका: एडेन मार्क्रम (कॅप्टन), क्विंटन डीकॉक (विकेटकीपर), रयान रिकलटन, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, डेविड मिलर, मार्को यानसन, कैगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, केशव महाराज, कॉर्बिन बॉश, एनरिक नार्किया, क्वेना मफाका, जॉर्ज लिंडे, जेसन स्मिथ.

नक्की वाचा - T20 World Cup 2026: भारतापुढे 'सुपर 8' मध्ये तगडे आव्हान; 'ग्रुप ऑफ डेथ'मुळे सेमीफायनलची वाट खडतर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com