जाहिरात

IPL 2025 CSK Vs DC: चेन्नईचा गड 15 वर्षांनी कोसळला, दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर सुपर किंग्स अडचणीत

Delhi Capitals Vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 17 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने चेन्नईचा पराभव केला.

IPL 2025 CSK Vs DC: चेन्नईचा गड 15 वर्षांनी कोसळला, दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर सुपर किंग्स अडचणीत

IPL 2025 DC Vs CSK: इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 17 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने चेन्नईचा पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 184 धावाचे आव्हान पूर्ण करताना चेन्नईचा डाव 158 धावांवर आटोपला. चेन्नईकडून विजय शंकरने शानदार अर्धशतकी खेळी केली. तो 69 धावांवर नाबाद राहिला. 

दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 184 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. चेन्नईला दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का बसला. चेन्नईचा सलामवीर रविंद्र रचिन अवघ्या तीन धावांवर आऊट झाला. त्यानंतर तिसऱ्याच ओव्हरमध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाडही अवघ्या पाच धावा करुन आऊट झाला.

त्यानंतर चेन्नईचा डाव गडगडला मात्र विजय शंकरने एक बाजू सांभाळत झुंझार अर्धशतकी खेळी केली. मात्र तो संघाला विजयी करु शकला नाही. विजय शंकरला अखेरच्या ओव्हर्समध्ये महेंद्रसिंग धोनीने चांगली साथ दिली. धोनी 30 धावांवर नाबाद राहिला. विजय शंकरने नाबाद 54 चेंडूंमध्ये 69 धावा केल्या तर महेंद्रसिंग धोनी  26 बॉलमध्ये 30 धावा करुन नाबाद राहिला. 

तत्पुर्वी,  चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात खूपच खराब झाली कारण सलामीवीर जेक फ्रेझर मॅकगर्कला त्याचे खातेही उघडता आले नाही. केएल राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी सीएसकेच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केले आणि त्यांच्यात 54 धावांची भागीदारी झाली. पोरेलने 20 चेंडूत 33 धावांची जलद खेळी केली. कर्णधार अक्षर पटेल क्रीजवर होता, पण 21 धावा करून तो बाद झाला. 

चेन्नईकडून खलील अहमद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, ज्याने 2 बळी घेतले. तर रवींद्र जडेजा, नूर अहमद आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. नूर अहमद अजूनही पर्पल कॅपचा दावेदार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: