जाहिरात

GT Vs DC: 4,4,4,4... जॉस बटलरचे तुफान, दिल्लीचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा!

Gujarat Titans vs Delhi Capitals: दिल्लीच्या संघाने दिलेल्या 204 धावांचा पाठलाग गुजरातच्या संघाने चेंडूमध्ये पूर्ण केले. गुजरातकडून जॉस बटलरने सर्वाधिक धावा केल्या. 

GT Vs DC: 4,4,4,4...  जॉस बटलरचे तुफान, दिल्लीचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा!

IPL 2025 DC Vs GT: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या मैदानात आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले. आयपीएलचा हा 35 वा सामना गुजरातच्या घरात म्हणजे अहमदाबाद येथे पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्लीचा पराभव करत होमग्राऊंडवर पराभव करत जोर का झटका दिला. दिल्लीच्या संघाने दिलेल्या 204 धावांचा पाठलाग गुजरातच्या संघाने चार बॉल राखून पूर्ण केले. गुजरातकडून जॉस बटलरने सर्वाधिक नाबाद 97 धावा केल्या. त्याचे वादळी शतक अवघ्या तीन धावांनी हुकले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने दिलेल्या 204 धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाने सावध सुरुवात केली. गुजरात टायटन्सला कर्णधार शुभमन गिलच्या रूपाने पहिला धक्का बसला. पाच चेंडूत एका चौकाराच्या मदतीने सात धावा काढल्यानंतर गिल बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शनच्या रूपाने गुजरात टायटन्सला दुसरा धक्का बसला. त्याने 36 धावा केल्या.

सुरुवातीच्या दोन विकेट्स गेल्यानंतर गुजरातचा डाव जॉस बटलर आणि शरफेन रदरफोर्डने सावरला. जॉस बटलरने वादळी अर्धशतकी खेळी केली. त्याचे ऐतिहासिक वादळी शतक 3 धावांनी हुकले.  त्याला शरफेन रदरफोर्डने साथ दिली. रदरफोर्डने 34 बॉलमध्ये 43 धावा केल्या.  या दोघांच्या तुफान फटकेबाजीने गुजरातचा विजय सोपा केला.

तत्पुर्वी, नाणेफेक गमावल्यानंतरही दिल्ली कॅपिटल्सने मोठी धावसंख्या उभारली. दिल्लीच्या संघाने 20 ओव्हरमध्ये  8 विकेटच्या बदल्यात 203 धावा केल्या. या डावात दिल्लीकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 38 धावा केल्या. तर आशुतोष शर्माने ३७ धावांचे योगदान दिले. ट्रिस्टन स्टब्स आणि करुण नायर यांनीही 31- 31 धावा केल्या. दुसरीकडे, गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या व्यतिरिक्त, मोहम्मद सिराज, अर्शद खान, इशांत शर्मा आणि साई किशोर यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.