
आयपीएल 2025 च्या पहिल्याच सामन्यात मराठामोळा अजिंक्य रहाणे चमकला. पहिला सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात झाला. या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकली. केकेआरने आरसीबीला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. गोलंदाजी करण्याचा आरसीबीचा निर्णय योग्य ठरवत हेझलवूडने पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकला बाद केले. दोन षटकात केकेआरला केवळ पाच धावा करता आल्या. मात्र त्यानंतर अजिंक्य राहाणे नावाच्या वादळाने आरसीबीच्या स्वप्नावर पाणी फेरलं. अजिंक्य रहाणेनं हंगामातील पहिली अर्धशतक झळकावत संघाला एका मजबूत स्थिती नेलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयपीएल 2025 मध्ये पहिल्या दोन टप्प्यात अजिंक्य रहाणेवर कुणी ही बोली लावली नव्हती. मात्र शेवटच्या क्षणी केकेआरने त्याला आपल्या संघात घेतला. शिवाय त्याला कर्णधारही केलं. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय त्याने पहिल्या सामन्यात सार्थ असल्याचे दाखवून दिले. संघ अडचणीत असताना अजिंक्य राहणेने वादळी खेळी केली. त्याने अवघ्या 25 चेंडूत अर्ध शतक पूर्ण केलं. नवव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटका ठोकत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केलं.
यावेळी त्याने सुनील नरेनबरोबर शतकी भागीदारी ही केली. अजिंक्य रहाणेने पॉवरप्लेमध्ये जबरदस्त खेळ करत तो आरसीबीच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने केवळ 16 चेंडूत 39 धावा कुटल्या. त्या आधी त्याने चौथ्या षटकात चौकार मारत आपले खाते उघडले. पुढे रसिक सलामच्या एका षटकात त्याने 2 षटकार वसूल केले. कृणाल पंड्याला हा रहाणेच्या बॅटचा तडाखा बसला. त्याच्या एकाच षटकात त्याने दोन चौकार लगावले.
ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: सुपर ओव्हरचा थरार बंद! यंदाच्या IPLमध्ये 6 नवे नियम; 'असा' ठरणार विजेता
आरसीबीच्या यश दयाल हा ही रहाणेच्या तावडीतून सुटला नाही. सहाव्या षटक रहाणेने 2 चौकार आणि 1 षटकार दयाल कडून वसूल केला. रहाणेच्या धमाकेदार बॅटींग मुळे केकेआरला दहा षटकांच्या आतच 100 धावांचा टप्पा पार करता आला. त्याला सुनील नेरेनची चांगली साध मिळाली. त्याला 44 धावा करता आल्या. त्यात 3 षटकारांचा समावेश आहे. अजिक्य रहाणेने 31 चेंडूत 56 धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीत त्याने 4 षटकार आणी 6 चौकार लगावले. त्याच्या या खेळीमुळे केकेआरला 20 षटकात 174 धावा काढता आल्या. रिंकू सिंह आणि व्यंकटेश अय्यर यांनी मात्र निराशा केली. कुणाल पंड्याने आरसीबीकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world