
IPL 2025: आयपीएलचा थरार आजपासून सुरू होत आहे. स्पर्धेची सुरुवात २२ मार्च रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणाऱ्या उद्घाटन समारंभाने होईल. या लीगमध्ये १० फ्रँचायझी संघ सहभागी होत आहेत. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये पहिला सामना पार पार पडणार आहे. या आयपीएलमध्ये महत्त्वाचे पाच नियम बदलणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1. दोन नवीन चेंडू..
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच एका डावात दोन नवीन चेंडू वापरता येतील. दवाचा प्रभाव कमी करता यावा म्हणून बोर्डाने यासाठी नियम बदलले आहेत. हा निर्णय फक्त संध्याकाळी सुरू होणाऱ्या सामन्यांसाठी लागू असेल. त्यानुसार, दुसऱ्या डावाच्या 11 व्या षटकापासून नवीन चेंडूचा पर्याय दिला जाईल. हा निर्णय पंचांवर अवलंबून असेल.
2. लाळ लावण्यास परवानगी..
कोविड काळात आयसीसीने चेंडूवर लाळ वापरण्यास बंदी घातली होती. ही बंदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही लागू आहे पण आयपीएलमध्ये असे होणार नाही. बीसीसीआयने लाळेवरील बंदी उठवली आहे. आता खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी लाळ वापरू शकतील, ज्यामुळे रिव्हर्स स्विंगला मदत होईल. अलिकडेच मोहम्मद शमीने ही बंदी हटवण्याची मागणी केली होती.
3. डीआरएसमध्ये बदल
आयपीएलमध्येही डीआरएसचा विस्तार करण्यात आला आहे. आता डीआरएसचा वापर नो-बॉल आणि ऑफ-साईडवर वाइड बॉलसाठी देखील करता येतो. यासाठी हॉक-आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
4. संथ गतीने षटके टाकल्यास बंदी नाही
आयपीएलमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधारांनाही दिलासा मिळाला आहे. आता कर्णधारांना स्लो ओव्हर रेटमुळे बंदीचा सामना करावा लागणार नाही. हार्दिक पांड्या या हंगामात मुंबई इंडियन्सकडून पहिला सामना खेळू शकणार नाही कारण त्याला स्लो ओव्हर रेटमुळे बंदी घालण्यात आली होती. ही बंदी आधीच लागू आहे त्यामुळे पंड्याला ती पूर्ण करावी लागेल पण येणाऱ्या सामन्यांमध्ये प्रत्येक कर्णधाराला दिलासा मिळाला आहे.
5. सामन्याची फी दिली जाणार
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सामन्याचे शुल्कही दिले जाईल. आता एका खेळाडूला एका सामन्यासाठी ७.५० लाख रुपये मिळतील. जर एखादा खेळाडू १४ सामने खेळला तर त्याला १.०५ कोटी रुपये सामना शुल्क देखील मिळेल. ही रक्कम लिलावात लावलेल्या बोलीव्यतिरिक्त असेल.
6. सुपर ओव्हरचा थरार बंद..
या सामन्यापासून आयपीएलमध्ये सुपर ओव्हरचा नवीन नियम लागू होईल. या नियमानुसार, दोन्ही संघांना सुपर ओव्हर पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त एक तासाचा वेळ दिला जाईल. जर तोपर्यंत निकाल लागला नाही, तर सामन्याचा निकाल बरोबरीत नोंदवला जाईल. जर सामना बरोबरीत राहिला तर विजेता निश्चित होईपर्यंत हवे तितके सुपर ओव्हर्स खेळवता येतील. परंतु पहिला सुपर ओव्हर सामना संपल्यानंतर १० मिनिटांच्या आत सुरू झाला पाहिजे.
जर पहिला सुपर ओव्हर बरोबरीत राहिला तर पुढचा सुपर ओव्हर पाच मिनिटांनी सुरू झाला पाहिजे. सुपर ओव्हरचा नवीन नियम फक्त गट सामन्यांमध्ये लागू असेल. अंतिम सामन्यासह, जिथे विजेता ठरवणे महत्त्वाचे असते, अशा सामन्यांमध्ये एक तासाचे बंधन राहणार नाही. सुपर ओव्हरच्या या नियमात पंच आणि सामनाधिकारी यांची भूमिका वाढली आहे. एक तासाच्या सामन्यात, शेवटचा सुपर ओव्हर कोणता असेल हे पंच ठरवतील आणि ते दोन्ही कर्णधारांना त्याबद्दल माहिती देतील.
IPL 2025: IPLच्या तिकीटांची विक्री सुरु! काय आहेत दर अन् कसे कराल बुकिंग? लगेचा वाचा...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world