जाहिरात

MI vs DC: मुंबईचा दिल्लीवर दमदार विजय, प्ले ऑफमध्ये स्थान झालं निश्चित

सुर्याने केलेल्या फटकेबाजी मुळे मुंबईला 20 ओव्हर्समध्ये 180 धावा करता आल्या. मुंबईचे पाच फलंदाज बाद झाले.

MI vs DC: मुंबईचा दिल्लीवर दमदार विजय, प्ले ऑफमध्ये स्थान झालं निश्चित

मुंबईने दिलेल्या 180 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. के.एल. राहुल, कर्णधार फाफ डू प्लेसी आणि अबिशेक पोरेल हे आघाडीचे फलंदाज स्वस्त्यात तंबूत परतले. राहुल 11, डू प्लेसी आणि पोरेल यांनी प्रत्येकी सहा धावा केल्या.  विपराज निगम, ट्रिस्टन स्टब हे ही जास्त काही करु शकले नाही. दहा ओव्हर्समध्ये दिल्लीची निम्मी टिम तंबूत परतली होती. समिर रिझवीने थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने एक बाजू लावून धरत 39 धावांची खेळी केली. मुंबईकडून मिचेल सँटनर ने तीन फलंदाज बाद केले. बुमराची त्याला चांगली साथ मिळाली. दिल्लीचा डाव 121 धावांत गडगडला. मुंबईने दिल्लीचा 60 धावांनी पराभव करत आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये आपली जागा फिक्स केली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिल्ली कॅपीटल आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला महत्वाचा सामना वानखेडे स्टेडीअमवर झाला. दिल्लीने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दिल्लीचा नियमित कर्णधार अक्षर पटेल खेळला नाही. त्याच्या ऐवजी फाफ डू प्लेसी यांनी कॅप्टन्सी केली. मुंबईच्या डावाची सुरूवात चांगली झाली नाही. रोहित शर्माने घरच्या मैदानावर खेळताना निराशा केली. तो अवघ्या पाच धावा काढून बाद झाला. 

ट्रेंडिंग बातमी - Rohit Sharma : रोहित शर्माच्या अचानक निवृत्तीचं कारण उघड, BCCI नं फेटाळली होती 'ती' मागणी!

त्यानंतर रायन रिकलटन आणि विल जॅक्स यांनी छोटी भागिदारी केली. पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रायन 25 तर विल 21 धावा काढून बाद झाला. त्यानंतर सामन्याची सुत्र सुर्यकुमार यादव याने आपल्या हातात घेतलीय त्याने बाजू लावून धरली. दुसऱ्या बाजून मुंबईच्या विकेट पडत होत्या. अशा वेळी त्याने आधी तिलक वर्मा आणि नंतर नमन धिर याच्या बरोबर छोटी पण महत्वाची भागिदारी केली. सुर्याने सर्वाधिक 73 धावा केल्या. त्यात चार सिक्स आणि सात फोरचा समावेश होता. 

ट्रेंडिंग बातमी - Vaibhav Suryavanshi : 500 मिस कॉल, 4 दिवस फोन बंद, 'गुरु द्रविड' समोर वैभव सुर्यवंशीनं दिली कबुली

सुर्याने केलेल्या फटकेबाजी मुळे मुंबईला 20 ओव्हर्समध्ये 180 धावा करता आल्या. मुंबईचे पाच फलंदाज बाद झाले. दिल्लीकडून मुकेश कुमार याने दोन फलंदाजांना बाद केले. तर दुश्मंत चमीरा, विपराज निगम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक फलंदाजाला बाद केले. मुंबईला प्ले ऑफमध्ये खेळण्यासाठी हा सामना महत्वाचा होता. या सामन्यात मुंबईने दिल्लीला विजयासाठी 181 धावांचे लक्ष्य दिले होते.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com