जाहिरात

MI VS RR: मुंबई इंडियन्सच्या विजयाचा षटकार, राजस्थानला घरच्या मैदानावरच लोळवले

रोहित शर्मा आणि रायन रिकलटन या सलामीच्या जोडीने 11 ओव्हर्समध्ये 116 धावांची शतकी भागीदारी केली.

MI VS RR:  मुंबई इंडियन्सच्या विजयाचा षटकार, राजस्थानला घरच्या मैदानावरच लोळवले
फोटो सौजन्य- आयपीएल

राजस्थान रॉयल्स समोर मुंबईने 218 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मागिल मॅचचे हिरो यशस्वी जैसवाल आणि वैभव सुर्यवंशी हे दोघे ही अपयशी ठरले. राजस्थानच्या डावाची सुरूवात चांगली झाली नाही. वैभव सुर्यवंशी शुन्य धावांवर बाद झाला. त्या पाठोपाठ यशस्वी जैसवाल हा 13 धावा काढून बाद झाला. नितीश राणाला ही फार काळ तग धरता आला नाही. तो ही 9 धावा काढून तंबूत परतला. कॅप्टन रियान पराग परत एकदा अपयशी ठरला. त्याला केवळ 16 धावा करता आल्या. हेटमायरला तर भोपळाही फोडता ला नाही. त्यामुळे राजस्थानची अवस्था 5 ओव्हरमध्ये 5 बाद 47 अशी झाली होती.  त्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी तंबूत जाण्याची लाईनच लावली होती. एकही फलंदाज मुंबई समोर टिकाव धरू शकला नाही. राजस्थानची पूर्ण टीम 116 धावांत बाद झाली. मुंबईने राजस्थानवर 100 धावांनी विजय मिळवला.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई इंडीयन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात राजस्थानने टॉस जिंकला. त्यांनी मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. त्यांचा हा निर्णय मुंबईच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवा. रोहित शर्मा आणि रायन रिकलटन या सलामीच्या जोडीने 11 ओव्हर्समध्ये 116 धावांची शतकी भागीदारी केली. रायन रिकलटन  याने 38 चेंडून 61 धावांची धुवाधार खेळी केली. त्यात तीन षटकार आणि सात चौकारांचा समावेश आहे. त्याला महीश थीकशाना याने बोल्ड आउट केले. 

ट्रेंडिंग बातमी - India's Squad For England Tour : रोहित शर्माचं भवितव्य ठरलं! फॉर्मातील 2 खेळाडूंना जागा नाही?

त्यानंतर रोहित शर्माही बाद झाला. रोहितने 36 चेंडूत 53 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे त्याच्या या खेळीत एकही षटकार त्याने लगावला नाही. त्याने 9 चौकार लगावले. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी आपली विकेट जावू दिली नाही. सुर्याने 23 चेंडूत 48 धावा केल्या. त्यात त्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. तर हार्दिक पंड्याने ही 23  चेंडूत  48 धावा केल्याय यात त्याने चार चौकार आणि एक षटकार ठोकला. 

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025 : मुंबई इंडियन्सला धक्का, दमदार कामगिरी करणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट

सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या दोघांचे ही अर्धशतक मात्र हुकले. वीस षटकात मुंबई इंडियन्सने दोन विकेट गमावत 217 धावा केल्या. महीश थीकशाना आणि रियान पराग याने प्रत्येकी एक विकेट घेतल्या. मुंबईने राजस्थान समोर 218 धावांचे लक्ष्य ठेवले. मुंबईला प्रत्येक मॅच दर मॅच आपला सुर गवसलेला दिसतो. गेल्या काही मॅच त्यांनी गमावलेल्या नाहीत. त्यामुळे प्ले ऑफ मध्ये खेळण्याच्या त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: