जाहिरात

IPL 2025: IPLच्या मैदानात 'श्रेयस'चा धमाका! 'या' रेकॉर्डने इतिहास घडवला, धोनीलाही मागे टाकलं...

IPL 2025 Shreyas iyer: श्रेयस अय्यरने मॅचविनिंग खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात श्रेयस अय्यरने 87 धावांची खेळी करत अनेक मोठे रेकॉर्डही आपल्या नावावर करुन घेतले.

IPL 2025: IPLच्या मैदानात 'श्रेयस'चा धमाका! 'या' रेकॉर्डने इतिहास घडवला, धोनीलाही मागे टाकलं...

IPL 2025 Final: आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ३ जून रोजी पंजाबचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होईल. अंतिम सामन्यातकर्णधार श्रेयस अय्यरने मॅचविनिंग खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात श्रेयस अय्यरने 87 धावांची खेळी करत अनेक मोठे रेकॉर्डही आपल्या नावावर करुन घेतले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तीन संघांना फायनलमध्ये आणणारा कर्णधार:

पंजाब किंग्स  फायलनमध्ये गेल्यानंतर आता श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासातील एकमेव कर्णधार बनला आहे ज्याच्या नेतृत्वाखाली तीन वेगवेगळ्या संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. यापूर्वी, कर्णधार म्हणून अय्यरने 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स, 2024 मध्ये केकेआर आणि आता पंजाब किंग्जचे नेतृत्व त्याच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत केले आहे. याशिवाय, अय्यर टी 20 क्रिकेटच्या इतिहासात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. 

T20मध्ये सर्वाधिक संघांचे नेतृत्व:

श्रेयस आता T-20 फायनलमध्ये सर्वाधिक संघांचे नेतृत्व करणारा भारतीय कर्णधार बनला आहे. टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक संघांचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये श्रेयस अय्यर 4, महेंद्रसिंग धोनी 2 , रोहित शर्मा 2 यांचा समावेश आहे. याशिवाय श्रेयस अय्यर प्लेऑफमध्ये तीन वेळा 50+ धावा करणारा पहिला आयपीएल कर्णधारही बनला आहे. 2020 च्या सुरुवातीला त्याने  दुबईत 50 चेंडूमध्ये 65 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर 2024 मध्ये 24 बॉलमध्ये 58 तर या हंगामात मुंबईविरुद्ध 40 बॉलमध्ये 81 धावांची खेळी केली होती. 

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, क्वालिफायर-2 मध्ये 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष

आयपीएल हंगामात पंजाबसाठी सर्वाधिक षटकार

त्याचवेळी अय्यर आयपीएल हंगामात पंजाबसाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. या हंगामात अय्यरने 39 षटकार मारण्याचा अद्भुत पराक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम पंजाब किंग्जकडून ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता. 2023 च्या हंगामात ग्लेन मॅक्सवेलने 36 षटकार मारले.

39* - श्रेयस अय्यर, 2025

36 - ग्लेन मॅक्सवेल, 2013

34 - ख्रिस गेल, 2019

34 - लियाम लिव्हिंगस्टोन, 2022

32 - केएल राहुल, 2018

IPL 2025 Final: आयपीएल 2025 चा फायनल एकदम खास! 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडणार

विजयी कर्णधार म्हणून पाचवे स्थान:

कर्णधार म्हणून सर्वाधिक आयपीएल विजयांच्या यादीत अय्यर आता पाचव्या स्थानावर आला आहे. अय्यरने आतापर्यंत कर्णधार म्हणून 50 विजय मिळवले आहेत. याशिवाय, तो आयपीएल प्लेऑफमध्ये पंजाब किंग्जसाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा तिसरा फलंदाज बनला आहे.

कर्णधार म्हणून सर्वाधिक आयपीएल विजय
136 – एमएस धोनी
89 – रोहित शर्मा
71 – गौतम गंभीर
68 – विराट कोहली
50* – श्रेयस अय्यर

आयपीएल प्लेऑफमध्ये पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
122 – वीरेंद्र सेहवाग विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 2014

115* – वृद्धिमान साहा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 2014

87* – श्रेयस अय्यर विरुद्ध मुंबई इंडियन्स 2025*
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com