RCB चं नशिबच फुटकं, आधी स्पर्धेला स्थगिती आता 'या' गोष्टीने वाढवली चिंता

RCB ची यंदाच्या हंगामातली कामगिरी ही विशेष उल्लेखनीय राहिली आहे. 11 सामन्यांत 8 विजय मिळवून RCB चा संघ सध्या गुणतालिकेत 16 गुणांनिशी दुसऱ्या स्थानावर आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे IPL 2025 चा हंगाम हा मध्येच स्थगित करावा लागला होता. IPL च्या इतिहासातील सर्वात कमनशीबी संघ अशी ओळख असलेल्या RCB ची यंदाच्या हंगामातली कामगिरी ही विशेष उल्लेखनीय राहिली आहे. 11 सामन्यांत 8 विजय मिळवून RCB चा संघ सध्या गुणतालिकेत 16 गुणांनिशी दुसऱ्या स्थानावर आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

भारत-पाक यांच्यातला युद्धतणाव निवळल्यानंतर BCCI ने 17 मे पासून IPL चा स्थगित हंगाम पुन्हा सुरु करण्याची घोषणा केली. परंतु ही घोषणा झाल्यानंतर RCB च्या संघासमोर अचानक संकट निर्माण झालेलं पहायला मिळत आहे.

Advertisement

RCB चा कर्णधार रजत पाटीदार दुखापतग्रस्त -

आपल्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामना खेळत असताना रजत पाटीदारच्या बोटाला दुखापत झाल्याचं कळतंय. या दुखापतीमधून तो अद्याप सावरलेला नसून यामधून सावरण्यासाठी त्याला अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळे RCB ची वैद्यकीय टीम त्याला या दुखापतीमधून बरं करण्यासाठी चांगलीच धावपळ करत असल्याचं कळतंय.

Advertisement

हे ही वाचा - India-Pakistan Tension निवळलं, IPL चा स्थगित हंगाम पुन्हा सुरु होणार; 6 ठिकाणी होणार सामने

याचसोबत आगामी इंग्लंड दौऱ्याआधी होणाऱ्या भारत अ संघाच्या दौऱ्यातही रजत पाटीदारची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटीदार RCB साठी उपलब्ध असेल की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Advertisement

पाटीदारच्या सहभागाबद्दल RCB चं संघ व्यवस्थापन आशावादी -

मिळालेल्या माहितीनुसार, RCB चं संघ व्यवस्थापन रजत पाटीदार उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध होईल याबद्दल आशावादी आहे. याचाच एक भाग म्हणून संघाच्या वैद्यकीय टीमने रजत पाटीदारला त्याच्या बोटाची विशेष काळजी घ्यायला सांगितली असून बोटाला Splint वापरण्याचाही सल्ला दिला आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन गरजेनुसार रजत पाटीदारला Impact Player म्हणून वापरण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय. त्यामुळे दुखापतीमधून वेळेत सावरण्यासाठी रजत पाटीदारला नेट सेशनमध्ये फलंदाजी न करण्याचा सल्ला देण्यात आलाय.

हेजलवूडच्या सहभागाबद्दलही प्रश्नचिन्ह कायम - 

RCB चा प्रमुख गोलंदाज जोश हेजलवूडही उर्वरित आयपीएल हंगामासाठी उपलब्ध असेल की नाही याबद्दल अद्याप साशंकता आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे हेजलवूड RCB कडून चेन्नईविरुद्धचा सामना खेळला नव्हता. त्याआधी हेजलवूड दुखापतीमुळे भारताविरुद्धची कसोटी मालिका, श्रीलंका दौरा आणि चॅम्पिअन्स ट्रॉफीला मुकला होता. यंदाच्या आयपीएलमध्येही तो सहभागी होईल की नाही याबद्दल साशंकता होती, परंतु हेजलवूडने वेळेत स्वतःला फिट करत आयपीएल खेळायला सुरुवात केली. त्यातच World Test Championship च्या अंतिम सामन्याला 11 जून पासून लंडन येथे सुरुवात होणार आहे. त्यामुळे हेजलवूड आयपीएलसाठी भारतात परतेल याची शक्यता कमीच मानली जात आहे. 

Topics mentioned in this article