जाहिरात

RR Vs KKR: वरुण, मोईनच्या फिरकीत राजस्थानची दाणादाण! केकेआरसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Rajastan Royals vs Kolkata Knight Riders: कोलकाताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याने राजस्थानच्या फलंदाजांनची दाणादाण उडाली.

RR Vs KKR:  वरुण, मोईनच्या फिरकीत राजस्थानची दाणादाण! केकेआरसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

IPL 2025 RR Vs KKR: आयपीएलच्या मैदानात आज राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामना सुरु आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने कोलकातासमोर विजयासाठी 152 धावांचे आव्हान ठेवले आहे. कोलकाताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याने राजस्थानच्या फलंदाजांनची दाणादाण उडाली. त्यांनी 9 विकेट्स गमावत 151 धावा केल्या. राजस्थानकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक 33 धावा केल्या.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. राजस्थानला चौथ्या षटकामध्ये संजू सॅमसनच्या रुपाने पहिला धक्का बसला. संजू सॅमसनने 11 चेंडूंमध्ये 33 रन केल्या. त्यानंतर रियान पराग आणि यशस्वी जयस्वालने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र रियान परागही लवकर आऊट झाला. त्याने 15 चेडूंमध्ये 25 धावा केल्या. त्यापाठोपाठ 23 चेंडूंमध्ये 29 धावा करुन यशस्वी जयस्वालही तंबुत परतला.  या खेळीत त्याने 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. पहिल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या निराशेनंतर राजस्थानच्या उर्वरित खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या षटकांमध्ये ध्रुव जुरेलने 28 चेंडूंमध्ये 33 धावा केल्या. कोलकाताकडून केकेआरकडून वरुण चक्रवर्ती, मोईन अली, हर्षित राणा आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: