
रॉयल चॅलेंज बंगळूरूने आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. बंगळूरूने पंजाबचा मोठ्या फरकाने पराभव करत फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. पंजाबला आधी 101 धावांवर बंगळुरूने रोखले. पंजाबने दिलेल्या माफक लक्षाचा पाठलाग करताना बंगळूरून जास्त श्रम घ्यावे लागले नाही. त्यांनी सहज विजय मिळवला. बंगळूरूने आक्रमक सुरूवात केली. विराट कोहली 12 चेंडूत 12 धावा काढून बाद झाला. मयंक अगरवाल हा ही 13 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. फिल सॉल्टने आक्रमक खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला कॅप्टन रजत पाटीदारची साथ मिळाली. त्याने दहाव्या ओव्हर्सच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत बंगळूरूला विजय मिळवून दिला. बंगळूरूने 10 ओव्हर्स आणि 8 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. फिल सॉल्टने 27 बॉलमध्ये 56 धावा ठोकल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कॉलीफायर वनमध्ये बंगळूरू विरुद्ध पंजाब यांच्यात सामना रंगला. बंगळूरूने टॉस जिंकत पंजाबला बॅटींग करण्याचे निमंत्रण दिले. बंगळूरूचा हा निर्णय अगदी बरोबर ठरला. पंजाबच्या एकाही फलंदाजाला मैदानात ठाम पणे उभे राहाता आले नाही. त्यांचा डाव अगदी पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळला. पंजाबला 20 ओव्हर्स ही पूर्ण खेळता आल्या नाहीत. पंजाबचा डाव 14.1 ओव्हर्समध्ये अवघ्या 101 धावांत गडगडला. पंजाबकडून मार्कस स्टोइनिस याने सर्वाधिक 26 धावा केल्या. ओमरझाई आणि प्रभसिमरन सिंग यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. यांच्या शिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
पंजाबच्या फलंदाजांमध्ये बाद होण्याची जणू स्पर्धा लागली होती. प्रियांश आर्य सात धावा काढून बाद झाला. त्याच्या नंतर जॉश इंग्लिस 4, श्रेयस अय्यर 2, नेहल वाधेरा 8, शशांक सिंग 3, मुशीर खान 0, हरप्रीत ब्रार 4 धावा केल्या. यांची अवस्था तू चल मै आया अशीच झाली होती. यांनी फक्त मैदानावर हजेरी लावण्याचे काम केले. संपूर्ण डावात फक्त चार सिक्स लगावले गेले.
बंगळूरूच्या बॉलर्सनी पंजाबच्या बॅट्समनवर पहिल्यापासून अंकूश ठेवला होता. त्यांना डोक वर काढण्याची संधी बंगळूरूच्या बॉलर्सनी शेवटपर्यंत दिलीच नाही. जॉश हेझलवू याने 21 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर सुयाश शर्मा याने 3 ओव्हर्समध्ये अवघ्या 17 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर यश दयालने दोन जणांना बाद केले. भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येक एक विकेट घेतली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world