
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टेस्टच्या सीरिजसाठी (India vs England Test Series) टीम इंडियानं तयारी सुरु केली आहे. 20 जूनपासून सुरु होणारी ही सीरिज अनेक कारणांसाठी खास आहे. या सीरिजपासून 2025-2027 दरम्यानच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) भारतीय टीमची मोहीम सुरु होईल. त्याचबरोबर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दिग्गजांच्या निवृत्तीनंतरची ही पहिलीच सीरिज आहे. शुबमन गिलची (Shubman Gill) कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली आहे. टीम इंडियातील नव्या पर्वाची या सीरिजपासून सुरुवात होईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोहित आणि विराट यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी, बीसीसीआयने भारतीय सपोर्ट स्टाफची हकालपट्टी केली होती. सहाय्यक कोच अभिषेक नायर (Abhishek Nayar) आणि फिल्डिंग कोच टी. दिलीप (T Dilip) यांचा समावेश होता.
पण, बीसीसीआयने योग्य पर्याय शोधण्यात अपयश आल्याने इंग्लंडच्या आगामी दौऱ्यासाठी टी. दिलीप यांची टीम इंडियाचे फिल्डिंग कोच म्हणून नियुक्की करण्यात आली आहे. 'पीटीआय' च्या रिपोर्टनुसार बीसीसीआय नवा फिल्डिंग कोच म्हणून परदेशी व्यक्तीच्या शोधात होते. पण, त्यांना त्यामध्ये यश मिळाले नाही. 'क्रिकबझ'च्या रिपोर्टनुसार टी. दिलीप यांची पुन्हा नियुक्ती करण्यामागे माजी कर्णधार रोहित शर्माचा आग्रह होता.
( नक्की वाचा : IPL 2025: मुंबई इंडियन्स यंदा राहणार ट्रॉफीपासून दूर, 'हा' विचित्र योग आहे कारण! )
या रिपोर्टनुसार, रोहितने टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांना दिलीप यांना एक वर्षांची मुदतवाढ द्यावी अशी विशेष विनंती केली.
यापूर्वीच्या वृत्तानुसार दिलीप बाहेर पडल्यानंतर बीसीसीआय रायन टेन डोश्येटला (Ryan ten Doeschate) फिल्डिंग कोच म्हणून नियुक्त करण्याचा विचार करत होतं. पण, तो आता गंभीरचा सहाय्यक कोच म्हणून काम करेल.
दिलीप यांनी यापूर्वीच्या काळात टीम इंडियाच्या फिल्डिंगचा स्तर सुधारावा यासाठी खास प्रयत्न केले होते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मॅच संपल्यानंतर सर्वोत्तम फिल्डरला मेडल देणे आणि ते देण्यासाठी दिग्गज खेळाडूला आमंत्रित करणे या त्यांच्या उपक्रमांची चांगलीच चर्चा झाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world