जाहिरात

Rohit Sharma: रोहित शर्माचा जबरदस्त कारनामा! आफ्रिदीचं 'हे' रेकॉर्ड मोडत बनला जगातला पहिला बॅट्समन

रांची इथं टीम इंडिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला वनडे सामना खेळाला जात आहे.

Rohit Sharma: रोहित शर्माचा जबरदस्त कारनामा! आफ्रिदीचं 'हे' रेकॉर्ड मोडत बनला जगातला पहिला बॅट्समन
  • रोहित शर्माने वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा जागतिक विक्रम मोडला आहे.
  • त्याने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा ३४९ षटकारांचा विक्रम मागे टाकला.
  • रोहितने हा विक्रम केवळ २७७ एकदिवसीय सामन्यांत गाठला.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

IND vs SA, 1st ODIs: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे मॅचमध्ये हीट मॅन रोहित शर्माने इतिहास रचला आहे. त्याने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रीदीचा सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहितने शाहिद आफ्रिदीला मागे टाकत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.  रोहितने 350 पेक्षा जास्त षटकरा ठोकणारा जगातला पहिली फलंदाज ठरला आहे. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi)349 षटकारांचा विक्रम मोडला आहे.

या सामन्यात रोहितने शानदार अर्धशतक झळकावत टीम इंडियासाठी 350 षटकार पूर्ण केले. विशेष म्हणजे, त्याने हा टप्पा आफ्रिदीच्या 398 सामन्यांच्या तुलनेत केवळ 277 व्या एकदिवसीय सामन्यातच गाठला आहे.  रोहित शर्माने भारता कडून खेळताना सर्वाधिक  350 षटकार ठोकले आहे. त्यानंतर  शाहिद आफ्रिदीने 349 षटकार ठोकले आहेत. सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे. त्याने त्याच्या एकदिवसीय करिअर मध्ये 330 षटकार लगावले आहे.

नक्की वाचा - Virat Kohli Video: अरे बापरे! भर कार्यक्रमात हसता हसता अचानक विराट कोहलीच्या छातीत दुखू लागलं, नेमकं काय झालं?

या यादीत चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेच्या सनथ जयसुर्याचा नंबर आहे. त्याने 268 षटकार लगावले आहेत. तर 222 षटकार ठोकस MS धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने दक्षिण अफ्रिके विरुद्धच्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात चांगली सुरूवात केली. त्याल एक जिवदान ही मिळाले. मात्र त्यानंतर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने या खेळीत 3 षटकार ठोकले. त्याने 51 चेंडूत 57  धावांची खेळी केली. त्यानंतर तो LBW बाद झाला. पण आऊट होण्यात आधी त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला होता. 

नक्की वाचा - Gautam Gambhir : गौतम गंभीरची 'ती' चूक महागात पडणार? BCCI चा पारा चढला, पडद्यामागे काय घडलं?

रांची इथं टीम इंडिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला वनडे सामना खेळाला जात आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते. यशस्वी जैसवाल लवकर बाद झाल्यानंतर रोहित आणि विराट कोहली यांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रोहित आपलं अर्ध शतक पूर्ण केल्यानंतर बाद झाला. तर विराटने आपल्या शतकाच्या दिशेने वाटचाल केली होती. मात्र आजचा दिवस रोहितसाठी खास ठरला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com