
Salman Nizar 11 Sixes in 12 Ball: केरळ क्रिकेट लीगमध्ये अदाणी तिरुवनंतपुरम रॉयल्स आणि कालीकत ग्लोबस्टार्स यांच्यातील सामन्यात सलमान निझार या बॅटरनं क्रिकेटच्या इतिहासातील एक दुर्मिळ पराक्रम केला. त्याने केवळ 12 बॉलमध्ये 11 सिक्सच्या मदतीने 71 रन काढले. त्याच्या या आक्रमक बॅटिंगमुळे कालीकत ग्लोबस्टार्सने शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये 71 रन केले. निझारने इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 40 रन्स करत सर्वांनाच थक्क केले.
IPL 2026: राहुल द्रविड-राजस्थान रॉयल्सचं नातं संपुष्टात, मोठी ऑफर नाकारल्याने चर्चांना उधाण
कसा केला पराक्रम?
तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात 28 वर्षीय सलमान निझारने 26 बॉलमध्ये 86 रनची वादळी खेळी केली. यामध्ये त्याने 11 सिक्स लगावले. त्याची ही खेळी 330.77 च्या स्ट्राइक रेटने झाली. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या 13 बॉलमध्ये त्यानं फक्त 17 रन्सच केले होते. मात्र त्यानंतर त्याने वेग घेतला. 19 व्या ओव्हरमध्ये त्याने बसिल थंपीला लक्ष्य करत 31 रन काढले. यानंतर, शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने अभिजीत प्रवीणच्या गोलंदाजीवर सर्व लीगल बॉलवर सिक्स लगावले. यात अभिजीतने एक वाईड आणि एक नो-बॉल टाकल्यामुळे ओव्हरमध्ये एकूण 40 रन निघाले.
The final over was pure annihilation! Salman rewrote the final over with six brutal signatures. 🖋️💣#KCLSeason2 #KCL2025 pic.twitter.com/gVYjHxhp3H
— Kerala Cricket League (@KCL_t20) August 30, 2025
निझारच्या या खेळीमुळे कालीकट ग्लोबस्टार्सने 186 रन्स केले. अदाणी तिरुवनंतपुरम रॉयल्ससमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरादाखल, अदाणी तिरुवनंतपुरम रॉयल्स 173 रन्सवर ऑल आऊट झाली. संजीव सतरेसनने 34 तर रिया बशीरने 25 रन केले. सलमान निझारला त्याच्या अविश्वसनीय खेळीबद्दल 'प्लेयर ऑफ द मॅच' चा पुरस्कार देण्यात आला.
( नक्की वाचा : Rahul Dravid : 'द वॉल' ची प्रांजल कबुली, सचिन तेंडुलकर, गांगुली यांच्याकडून आदर मिळवणं होतं मोठं आव्हान! )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world