विजयाचा अतिउत्साह! टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती, 14 जणं जखमी

क्रिकेट टीमच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत 14 जणं किरकोळ जखमी झाले होते. याशिवाय 11 जणांवर जीटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विश्वचषक जिंकून मायदेशी परतलेल्या क्रिकेट टीमसाठी अख्खी मुंबई वानखेडे स्टेडिअमवर अवतरल्याचं चित्र गुरुवारी सायंकाळी पाहायला मिळालं. चाहत्यांचा महापूर मुंबईत लोटल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागला. टी20 वर्ल्ड कप विजेच्या टीमच्या विक्ट्री परेडनंतर मरीन ड्राइव्हवर प्रत्येक ठिकाणी चपलांचा खच पाहायला मिळाला. क्रिकेटरांचा इतकं वेड की ठिकठिकाणी मुंबईकरांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. 

क्रिकेट टीमच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत 14 जणं किरकोळ जखमी झाले होते. याशिवाय 11 जणांवर जीटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तुडूंब गर्दीमुळे काही क्रिकेटप्रेमींना  श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना मोठी गर्दी पार करून  रूग्णालयापर्यंत पोहोचवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. वाढत्या गर्दीमुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला होता. चर्चगेट स्टेशनवरही सायंकाळी मोठी गर्दी पाहायला मिळाली. यामुळे कार्यालयातून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. 

चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती...
अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, गर्दीमुळे दहा जणांहून अधिक लहान मुलं बेपत्ता झाले होते. आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी मरीन लाइन्सजवळ लाखो क्रिकेटप्रेमींची गर्दी झाली होती. एका तरूणीला खांद्यावर घेऊन पोलीस लाखोंच्या गर्दीतून वाट काढत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तरूणीला भोवळ आल्याची शक्यता आहे. चाहत्यांच्या महापूरातून तरुणीला उपचारासाठी बाहेर घेऊन जाण्याचं पोलिसासमोर मोठं आव्हान होतं. गर्दी पोलिसाला लोटत असल्याचं या व्हिडिओमधून दिसतंय.   

Advertisement

T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे मुंबईत शानदार स्वागत करण्यात आलं. मात्र या दरम्यान मरीन ड्राईव परिसरात जमलेल्या लाखोंच्या गर्दीत काही जणांना श्वास घेण्यास त्रास  झाला असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मरीन ड्राईव परिसरात एका दुकानात गर्दीतील काही जणांना बाहेर काढून उपचार करण्यात येत असल्याचंही दिसत आहे. काल गर्दीमुळे गुदमरून आणि इतर कारणांमुळे 9 जणं जखमी झाले होते. त्यापैकी 7 जणांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर दोन अजूनही दाखल आहेत.

Advertisement