जाहिरात
This Article is From Feb 12, 2026

IND vs NAM: टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, फिरकीच्या जाळ्यात नामिबियाची शिकार

नामिबियाला विजयासाठी 210 धावांचे लक्ष देण्यात आले होते.

IND vs NAM: टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, फिरकीच्या जाळ्यात नामिबियाची शिकार
सौ. बीसीसीआय

T20 World Cup 2026: टीम इंडियाने टी 20 वर्ल्डकपमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियाने नामिबिया समोर 210 धावांचे लक्ष दिले होते. नामेबियाने पॉवर प्लेमध्ये 58 धावा करत चांगली सुरूवात केली होती.  पॉवर प्लेमध्ये अर्थदीप सिंगने भारताला पहिले यश मिळवून दिले होते. त्यानंतर बॉलिंगला आलेल्या वरूण चक्रवतीच्या फिरकीच्या जाळ्यात नामिबियाचे बॅट्समन अडकले. वरूणने एकामागोमाग तीन झटके नामिबियाला दिले. ज्यामुळे  58 धावांवर एक बाद असलेल्या नामिबियाची अवस्था 10 ओव्हमध्ये 5 बाद 88 झाली होती. वरूणला अक्षर पटेलची चांगली साथ मिळाली. त्याने ही दोन गडी बाद केले. हार्दिक पंड्याने दोन तर बुमराने एक विकेट घेतली.  शिवम दुबेने ही एक विकेट घेतली. नामिबियाचा संपूर्ण डाव 116 धावांवर बाद झाला. टीम इंडियाने  93 धावांनी विजय मिळवला. 

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हार्दिक पांड्याचा तोच जुना 'स्वॅग' पुन्हा एकदा पाहायला मिळाला. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात जेव्हा टीम इंडियाला एका मोठ्या धावसंख्येची गरज होती, तेव्हा हार्दिकने मैदानात उतरताच जोरदार फटकेबाजी करत सर्वांचेच मनोरंजन केले. त्याच्या या स्फोटक खेळीने केवळ चाहत्यांचेच मनोरंजन केले नाही, तर डगआउटमध्ये बसलेले प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही दाद देण्यास भाग पाडले. हार्दिकने केवळ 28 चेंडूंत 52 धावांची तुफानी खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने  20 षटकांत 209 धावा करता आल्या. नामेबियाला विजयासाठी 210 धावांचे लक्ष देण्यात आले.  

नक्की वाचा - T20 WC :कधीकाळी पिझ्झा बनवायचा, आज नेपाळचे स्वप्न चक्काचूर केलं; क्रिकेट विश्वाला हादरवणारा इटलीचा 'हिरो' कोण?

हार्दिकच्या या खेळीत 4 उत्तुंग षटकार आणि 4 खणखणीत चौकारांचा समावेश होता. त्याच्या या फटकेबाजीमुळे भारताने निर्धारित 20 षटकांत 209 धावांचा डोंगर उभा केला. टॉस गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने 9 गडी गमावून 209 धावा केल्या. संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी 2 षटकांत 25 धावांची भागीदारी केली. संजूने चांगली सुरूवात केली. त्याने 8 चेंडूत 22 धावा ठोकल्या. त्यात तीन षटकारांचा समावेश होता. पण त्याला मोठी खेळी उभारता आली नाही.  त्यानंतर इशानने तिलक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी 31 चेंडूंत 79 धावा जोडून संघाला 100 च्या पार नेले.

नक्की वाचा - T20 World Cup: बॅट की जादू? टीम इंडियाबाबत श्रीलंकन खेळाडूची वेगळीच शंका, क्रिकेट विश्वात खळबळ

इशान किशनने 24 चेंडूंत 5 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 61 धावा कुटल्या. त्याने केवळ 20 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार सूर्यकुमार यादव 13 चेंडूंत 12 धावा काढून बाद झाला, तर तिलक वर्माने 21 चेंडूंत 25 धावा केल्या. भारताची अवस्था 4 बाद 124 अशी असताना हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे (23 धावा) यांनी 39 चेंडूंत 81 धावांची भागीदारी करून भारताला 200 चा टप्पा ओलांडून दिला. हार्दिक 52 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर भारताची खालची फळी पत्त्यासारखी कोसळली.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com