Gautam Gambhir Reaction On Virat Video : विराट कोहलीने रायपूरच्या मैदानाताही धावांचा पाऊस पाडून दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सलग दुसरं शतक ठोकलं. विराटने 102 धावांची दमदार शतकी खेळी केली. विराटची उल्लेखनीय कामगिरी पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ऑल टाइम ग्रेटमध्ये गणल्या जाणाऱ्या विराट कोहलीने रायपूरच्या मैदानावर प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आणि आपल्या वनडे करिअरमध्ये 53वं शतक ठोकलं. मार्को जेनसनच्या चेंडूला मिड ऑनकडे फटका मारून कोहलीने सलग दुसरं शतक ठोकलं. त्याच्या या शतकानंतर मैदानाचं दृश्यच काही वेगळं होतं. टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरनेही कोहलीच्या या शतकाचं स्वागत केलं आणि उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. गंभीरचा हा व्हिडीओ एक्सवर व्हायरल झाला आहे.
विराटचं शतक पूर्ण होताच गौतम गंभीरनं काय केल?
विराटचे जसे शतक पूर्ण केले, तेव्हा डगआउटमध्ये बसलेला गंभीर सर्व खेळाडूंसोबत उभं राहून टाळ्या वाजवून कोहलीचं कौतुक करत होता. गंभीरने टाळ्या वाजवत कोहलीचे स्वागत केले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की कोहली आणि गंभीर यांच्यात मनमुटाव सुरू आहे. पण गंभीरने हसत हसत किंग कोहलीला सलाम ठोकला.
भारताचा कोच गंभीरचा व्हिडीओ होतोय व्हायरल
🚨 53RD ODI HUNDRED FOR KING KOHLI 🚨
— Tanuj (@ImTanujSingh) December 3, 2025
- Virat Kohli is coming for 2027 World Cup..!!!! 🐐
pic.twitter.com/NCL0dG3NyE
कोहलीने शतक पूर्ण करताच आपल्या खास अंदाजात हात फिरवत हवेत उडी मारली. त्यानंतर काही वेळ त्याने प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले. मग दोन्ही हात वर करून देवाचे आभार मानले. टीम इंडियासाठी 18 नंबरची जर्सी अनेक वर्षांपासून असाच कमाल करत आहे. आजही किंग कोहलीने तोच कमाल केला आहे.
WHAT A FRAME. 🥶🐐
— Tanuj (@ImTanujSingh) December 3, 2025
- The Greatness Of Virat Kohli..!!!! pic.twitter.com/EljutRSSFf
कोहलीचं हे वनडे आणि कसोटी मिळून एकूण 83वं शतक आहे. रांचीमध्येही कोहलीने शतक ठोकलं होतं. म्हणजे सलग दोन वनडेमध्ये कोहलीनं कमाल केलीय. आता अशा शतकवीर खेळाडूचं स्वागत सर्वच करतील, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world