Vaibhav Sooryavanshi creates history: भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलचा थरार आज शनिवारी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये सुरु आहे. या सामन्याची रंगत सुरू असतानाच भारताचा स्टार युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये इंग्लंडविरुद्ध अंडर-19 विश्वचषक अंतिम सामन्यात (Under-19 World Cup Final) त्याने तुफानी फलंदाजी केली. इंग्लंडविरुद्ध सूर्यवंशीने जे करून दाखवलं,ते या मेगा इव्हेंटच्या तब्बल 37 वर्षांच्या इतिहासात यापूर्वी कधीच घडले नव्हते. ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या वीरेंद्र सहवाग, क्रिस गेल यांसारख्या जगप्रसिद्ध दिग्गजांनाही अशी कामगिरी करता आली नाही.
कोण मोडणार हे विक्रम?
सामान सुरु झाल्यानंतर वैभवने थोडा वेळ खेळपट्टीचा अंदाज घेतला. त्यानंतर वैभवने चौफेर फटकेबाजी करत मैदानात धावांचा पाऊस पाडला. शतक पूर्ण झाल्यावर वैभव आणखीनच आक्रमक झाला. वैभवने जेव्हा 80 चेंडूंमध्ये 175 धावांची वादळी खेळी केली, तेव्हा तो अंडर-19 विश्वचषकाच्या 37 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला.वैभवने इंग्लिश ज्युनियर गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत 15 गगनचुंबी षटकार आणि 15 चौकार ठोकले होते.आजच्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 15 षटकार ठोकले आणि विश्वविक्रम केला. ऑस्ट्रेलियाच्या मायकल हिलने 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामेबिया सामन्यात 12 षटकार ठोकले होते. तसच ऑस्ट्रेलियाचा क्रेग सिमन्सने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केन्या च्या सामन्यात 11 षटकार मारले होते.
नक्की वाचा >> आधरवाडी तुरुंगासमोरील 'त्या' बंगल्याची का होतेय चर्चा? KDMC अधिकाऱ्यांनी पाहणी करताच 'ते' सत्य आलं समोर
🚨 INDIA POSTED 411/9 IN 50 OVERS IN U-19 WORLD CUP FINAL 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) February 6, 2026
- One of the greatest batting performance ever in WC final. pic.twitter.com/amLPAdlns7
विश्वकप इतिहासातील पाच सर्वात मोठ्या इनिंग
| धावा | चेंडू | फलंदाज |
| 192 | 143 | विरान चामुडिथा |
| 191 | 117 | बेन मायेस |
| 175 | 80 | वैभव सूर्यवंशी |
| 163 | 142 | फॅसल शिनोजादा |
| 125 | 101 | जॅसन रोवल्स |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world