Womens World Cup Final 2025 BCCI : भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हरमनप्रीत नाही तर तिच्या amitmaru16 नावाच्या चाहत्याने शूट केला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये हरमनप्रीत त्याला विचारते, अमित तुझं स्वप्न काय आहे? यावर चाहता म्हणतो, दीदी माझं एकच स्वप्न आहे, तुम्ही भारताला वर्ल्ड कप जिंकून द्या. यावर हरमनप्रीत म्हणते, तुला इतकं सोपं वाटतं का? यानंतर उत्साहाच्या भरात चाहता म्हणतो, सोपं नाही, मला माहीत आहे. यंदा तुम्हीच वर्ल्ड कप भारतात आणाल. यावर हरमनप्रीत म्हणते, खरंय भारतात वर्ल्ड कप येऊन बराच काळ गेला.
संभाषणादरम्यान, त्या चाहत्याने तो कोणत्या क्रिकेटपटूचा चाहता आहे हे उघड करतो. त्याने हरमनप्रीत कौरला क्षणभर डोळे बंद करण्याचा सल्ला दिला आणि नंतर 'हिटमॅन' शर्माच्या आवाजात बोलू लागला. रोहितच्या आवाजात बोलताना चाहता म्हणाला, "अरे हो, डोळे उघड." हरमनप्रीत कौर दचकते अन् म्हणते, "अरे हिटमॅन." यावर चाहत्याने उत्तर दिले, "अरे हो, हे सोपे नाही, मला माहिती आहे. म्हणूनच मी हे म्हणत आहे. आपल्या मुली कोणत्याही मुलांपेक्षा कमी आहेत का? जिंकण्यासाठी किती वेळ लागतो ते मला विचारा."
पुढे हरमनप्रीत म्हणते, तू सर्व बरोबर म्हणालास. यंदा वर्ल्ड कप केवळ येईल अन् कोणी घेऊन जाऊ शकणार नाही. यादरम्यान हिटमॅनच्या वेशातील चाहता हरमनप्रीतला वर्ल्ड कप कसा पकडायचा याचं ट्रनिंग देतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world