Harmanpreet Kaur World Cup Trophy Tattoo: हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला क्रिकेट टीमला पहिल्यांदा वर्ल्डकप ट्रॉफी जिंकवून देणारी कॅप्टन ठरलीय. 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडिअममवर पार पडलेल्या महिला वर्ल्डकप फायनल मॅचमध्ये टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. देशवासीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. अविस्मरणीय आठवणी कायम मनात जपून ठेवण्यासाठी हरमनप्रीत कौरने दंडावर वर्ल्डकप ट्रॉफीचा टॅटू काढलाय. टॅटूचा फोटो तिने सोशल मीडियावरही शेअर केलाय.
Harmanpreet Kaur ने शेअर केला नव्या ट्रॉफीचा फोटो | Harmanpreet Kaur World Cup Trophy Tattoo Photo
हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur Tattoo) काढलेल्या नव्या टॅटूमध्ये 2025 आणि 52 या दोन संख्या दिसत आहेत. 2025चे कनेक्शन भारतीय महिला वनडे वर्ल्ड कप 2025 या किताबाशी आहे तर फायनल मॅचमध्ये टीम इंडियाने 52 रन्सनी साऊथ आफ्रिकेचा पराभव केला होता. या क्षणाच्या आठवणी आयुष्यभर डोळ्यांसमोर राहाव्या, यासाठी हरमनप्रीतने हा टॅटू काढलाय.
हरमनप्रीतने फोटोला दिले खास कॅप्शन
हरमनप्रीत कौरने टॅटूचा फोटो शेअर करुन म्हटलं की, "माझ्या त्वचेवर आणि हृदयावर कायम स्वरुपी कोरले गेलंय. पहिल्या दिवसापासून वाट पाहत होते. आता तुला रोज सकाळी पाहू शकेन आणि कृतज्ञता व्यक्त करेन".
(नक्की वाचा:Jemimah Rodrigues Dance Video: दिसते मी भारी...! जेमिमा रॉड्रिग्सने गुलाबी साडी या मराठी गाण्यावर मैदानात धरला ठेका)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

