जाहिरात

IPL 2025 Auction : वयवर्ष 18, 4.80 कोटींची बोली...कोण आहे MI ने खरेदी केलेला अल्लाह गझनफर?

अल्लाह गझनफरने आतापर्यंत 8 वन-डे सामन्यांमध्ये आपल्या राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ज्यात त्याच्या नावावर 12 विकेट आणि 238 धावा जमा आहेत.

IPL 2025 Auction : वयवर्ष 18, 4.80 कोटींची बोली...कोण आहे MI ने खरेदी केलेला अल्लाह गझनफर?
फोटो सौजन्य - ACB
मुंबई:

IPL 2025 च्या हंगामात मुंबई इंडियन्सने दुसऱ्या दिवसाच्या लिलावात धक्कादायक रणनिती आजमावत चांगल्या खेळाडूंची निवड केली आहे. रायन रिकल्टन, दीपक चहर यांच्यानंतर मुंबई इंडियन्सने अवघ्या 18 वर्षांचा अफगाणी फिरकीपटू अल्लाह गझनफरवर 4 कोटी 80 लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे.

उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक बॉलिंग करणाऱ्या अल्लाह गझनफरने List A क्रिकेट आपली चमक दाखवून दिली आहे. अल्लाह गझनफरने आतापर्यंत 8 वन-डे सामन्यांमध्ये आपल्या राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ज्यात त्याच्या नावावर 12 विकेट आणि 238 धावा जमा आहेत.

T-20 क्रिकेटमध्ये कशी राहिली आहे अल्लाह गझनफरची कामगिरी?

आतापर्यंत अल्लाहने 16 टी-२० सामने खेळले असून ज्यात त्याने 337 रन्स देत 29 विकेट्स घेतल्या आहेत. 12 धावांत 4 विकेट ही अल्लाह गझनफरची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. 5.71 ही त्याची सर्वोत्तम इकोनॉमी राहिली आहे.

याव्यतिरीक्त फलंदाजीत List A क्रिकेटमध्ये फलंदाजीत अल्लाहच्या नावावर एक अर्धशतकही जमा आहे. त्यामुळे गरजेच्या वेळी अखेरच्या फळीत फलंदाजीत अल्लाह गझनफर मुंबईसाठी उपयुक्त ठरु शकतो.

हे ही वाचा - IPL 2025 Auction : मुंबईला मिळाला नवा विकेटकिपर, 1 कोटींच्या बोलीवर घेतलेला रिकल्टन आहे तरी कोण?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com