जाहिरात

Net Worth : कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? विराट कोहली की लिओनेल मेस्सी? 99 टक्के लोकांना माहितीच नाही

फुटबॉलचा दिग्गज स्टार लिओनेल मेस्सी आणि किक्रेटचा किंग विराट कोहील, या दोघांमध्ये कोणाचं नेटवर्थ सर्वात जास्त आहे?

Net Worth : कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? विराट कोहली की लिओनेल मेस्सी? 99 टक्के लोकांना माहितीच नाही
Lionel Messi vs Virat Kohli
मुंबई:

Virat Kohli vs lionel messi Networth :  फुटबॉलचा दिग्गज स्टार लिओनेल मेस्सी 14 वर्षानंतर भारत दौऱ्यावर आला आहे. तो 13 डिसेंबरला कोलकात्यात पोहोचला,जिथे त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. मेस्सी तीन दिवस भारतात राहणार असून इतर शहरांनाही भेट देणार आहे. 38 वर्षांच्या वयातही लिओनेल मेस्सीची लोकप्रियता जगभरात वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्याकडे असलेलं फुटबॉलचं जबरदस्त कौशल्य आणि करिअरमध्ये केलेल्या अनेक विक्रमांमुळे त्याचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे.

मेस्सीचं नेटवर्थ 850 मिलियन डॉलर्स 

रिपोर्ट्सनुसार, लिओनेल मेस्सीचं नेटवर्थ 850 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 7700 कोटी रुपये आहे. सामन्यांची फी आणि मोठ्या स्पॉन्सरशिपमधून त्याला तगडी कमाई होती. ज्यामध्ये एडिडाससारख्या मोठ्या ब्रँडसोबतची लाइफटाइम डीलचाही समावेश आहे. मेस्सी जाहिरातींमधून भरपूर कमाई करतो.जाहिरातींमधून मेस्सी जवळपास 70 मिलियन डॉलर्सची कमाई करतो.त्याच्या ब्रँडमध्ये अॅपल,पेप्सी,मास्टरकार्ड,कोनामी यांसारख्या कंपन्या आहेत. तसेच मेस्सीकडे एडिडाससोबतची लाइफटाइम डील आहे.

नक्की वाचा >> स्मृती मंधानाने इन्स्टाग्रामवर अपडेट केला नवा BIO, काय लिहिलंय? पलाशसोबतचे 'ते' फोटोही केले डिलीट

विराट कोहलीचं नेटवर्थ किती?

क्रिकेटचा किंग विराट कोहली जरी टेस्ट आणि टी-20 मधून निवृत्त झाला असला, तरी त्याची लोकप्रियता कमी न होता आणखी वाढली आहे.अलीकडेच वनडेमध्ये सलग दोन शतके ठोकून कोहलीने धमाका केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर त्याची लोकप्रियता शिखरावर पोहोचली आहे. विराट कोहली क्रिकेटशिवायही खूप लोकप्रिय आहे.जगभरातील चाहते त्याला पसंत करतात.त्याच्या इन्स्टाग्रामवर 274 मिलियन फॉलोअर्स आहेत.जे एक टॉप-टियर खेळाडू म्हणून त्याची उपस्थिती दर्शवतात.

नक्की वाचा >> 'स्मृती मंधानाच्या हातात एंगेजमेंट रिंग नाही',लग्न रद्द झाल्याच्या चर्चांनंतर इन्स्टाग्रामवर टाकला पहिला Video

विराट कोहलीचं नेटवर्थ 1,505 कोटी (जवळपास 127 मिलियन)आहे. त्याच्या कमाईचे मुख्य स्रोत म्हणजे BCCI करार,IPL आणि मोठ्या कंपन्यांसोबतचे विविध ब्रँड एंडोर्समेंट्स.कोहलीने अलीकडेच आपला स्पोर्ट्स ब्रँड ‘वन8' एजिलिटास स्पोर्ट्सला विकला आहे. तसेच त्याने एजिलिटास स्पोर्ट्समध्ये 40 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com