World Cup Win: आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 फायनल मॅचपूर्वी टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरला असंख्य सल्ले मिळाले पण तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला होता तो म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिलेला कानमंत्र. दक्षिण आफ्रिकेविराधोतील ऐतिहासिक फायनल मॅचपूर्वी टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीतला सचिन तेंडुलकरने फोन केला होता. हरमनप्रीतने आयसीसी रिव्ह्यूमध्ये सांगितले की, मॅचपूर्वी सचिन सरांचा फोन आला होता. त्यांनी स्वतःचा अनुभव सांगत आम्हाला संतुलन टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, "जेव्हा मॅच वेगाने सुरू असेल तेव्हा सावकाश खेळण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही देखील खूप वेगाने खेळलात तर तुम्ही अडखळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो".
आम्ही जेव्हाही भेटतो तेव्हा एकमेकांना वर्ल्ड चॅम्पियन म्हणून संबोधतो. हा एक वेगळा अनुभव आहे. अशा पद्धतीच्या अनुभवाची आम्ही प्रतीक्षा करत होतो, अशाही भावना हरमनप्रीतने व्यक्त केल्या.
हरमनप्रीत कौरचे लहानपणापासूनचे स्वप्न
हरमनप्रीतने म्हटलं की, माझे आईवडील मैदानात होते, त्यांच्यासमोर वर्ल्डकप जिंकणे हा खास क्षण होता. लहानपणापासून ते मला ऐकत आले आहेत की, मला टीम इंडियाची जर्सी घालायचीय, देशासाठी खेळायचंय, कर्णधारपद भूषवायचंय आणि वर्ल्ड कप जिंकायचा आहे".
(नक्की वाचा: World Cup Win: अभिमान! महाराष्ट्राच्या खेळाडूंचा CM फडणवीसांच्या हस्ते गौरव, इतक्या कोटींचं दिलं बक्षीस)
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
महिला वर्ल्डकप फायनल मॅचमध्ये टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) टीमला धुळ चारली. यापूर्वी 47 वर्षांनंतर टीम इंडियाने महिला वर्ल्डकप जिंकलाय. वर्ल्डकपच्या फायनल मॅचमध्ये (World Cup 2025 Final Match) टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा 52 धावांनी पराभव करुन दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर देशभरात फटाक्यांची (World Cup Win Celebration) आतशबाजी करून देशवासीयांनी जल्लोष साजरा केला.
(नक्की वाचा: Jemimah Rodrigues: मी रोज रडायचे...जेमिमा रॉड्रिग्स मानसिकरित्या अस्वस्थ होती, Anxiety वर मात कशी करावी? वाचा)
(Content PTI Bhasha)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

