Jemimah Rodrigues: आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 (ICIC Women's World Cup 2025) स्पर्धेमध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. यादरम्यान टीम इंडियाची स्टार बॅटर जेमिमा रॉड्रिग्सने एंग्झायटी डिसऑर्डर (Anxiety Disorder) म्हणजे चिंता विकाराचा (Chinta Vikar) उल्लेख केला होता. या विकारामुळे तिला नेमका काय त्रास होत होता? तिनं यावर कशी मात केली? जाणून घेऊया...
"मी रोज रडायचे...": जेमिमा रॉड्रिग्स | Jemimah Rodrigues Anxiety Disorder
आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 (Women's World Cup 2nd Semifinal) स्पर्धेची सेमीफायनल मॅच जिंकल्यानंतर जेमिमाने सांगितले की, स्पर्धेची सुरुवात माझ्यासाठी खूप कठीण होती. स्पर्धेच्या सुरुवातीस मी चिंता विकाराने ग्रस्त होते. कित्येकदा मॅचपूर्वी मी आईला फोन करुन फक्त आणि फक्त रडायचे. जेव्हा तुम्ही एंग्झायटीचा सामना करत असता तेव्हा तुम्हाला सर्वकाही सुन्न वाटतं. नेमकं काय करायचंय हे कळत नाही"
जेमिमाने पुढे असंही म्हटलं की, "एक चांगली गोष्ट अशी होती की माझे आईवडील, अरुंधती (रेड्डी), स्मृति (मानधाना), राधा (यादव) हे सर्व माझ्या पाठीशी उभे राहिले. कित्येकदा मला अरुंधतीसमोर रडू कोसळायचं. स्मृती काहीही न बोलता माझ्यासोबत कायम असायची, पण तिचं असणंही माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. मी भाग्यवान आहे की माझ्याकडे असे मित्रमैत्रिणी आहेत, ज्यांना मी कुटुंब म्हणू शकते".
एंग्झायटी डिसऑर्डर म्हणजे काय? | What Is Anxiety Disorder
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगभरात अंदाजे 359 दशलक्ष लोक चिंता विकाराने ग्रासलेले आहेत, ज्यामध्ये महिलांची संख्या तुलनेने जास्त आहे. एंग्झायटी ही एक अशी मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये रुग्णाला सतत भीती, अस्वस्थता आणि तणाव यासारख्या गोष्टी जाणवत राहतात.
एंग्झायटीने ग्रस्त आहात, हे कसे समजते? | Anxiety Disorder Symtoms In Marathi
एंग्झायटी या समस्येची स्थिती सामान्य चिंतेच्या स्थितीपेक्षा वेगळी असते. या परिस्थितीमध्ये रुग्णाला सतत चिंता किंवा भीती वाटणे, कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते, हृदयाची गती अचानक वाढते, शरीराला अचानक घाम येतो, काहीही न करता थकवा जाणवतो, अचानक पोटदुखी होते, अस्वस्थ वाटते किंवा मळमळल्यासारखे वाटते, छोट्या-छोट्या गोष्टींचा राग येतो किंवा चिडचिड होते यासारखी लक्षणे दिसू लागतात. फार क्वचितच ही लक्षणे दिसत असल्यास प्रकरण सामान्य असू शकते, पण तुमच्यामध्ये ही लक्षणं दीर्घकाळ दिसत असल्यास तुम्ही चिंता विकाराचा (Anxiety Disorder) सामना करताय, हे लक्षात घ्यावे.
(नक्की वाचा: Jemimah Rodrigues Dance Video: दिसते मी भारी...! जेमिमा रॉड्रिग्सने गुलाबी साडी या मराठी गाण्यावर मैदानात धरला ठेका)
एंग्झायटीच्या समस्येवर मात कशी करावी? | Anxiety Disorder Treatments
WHOच्या रिपोर्टनुसार, एंग्झायटी विकारावर मात करता येणे शक्य आहे. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असाल तर सुरुवातीस स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा आणि मदत मागण्यास लाजू नका. विश्वासातील व्यक्तीशी संवाद साधा किंवा मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी.
(नक्की वाचा: Jemimah Rodrigues: मासिक पाळीच्या वेळी काय करता? जेमिमा रॉड्रिग्जनं दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही म्हणाल, अरे बापरे...)
एंग्झायटी समस्येचा सामना करत असाल तर या गोष्टीची काळजी घ्यावी- रोज योगासने आणि मेडिटेशन करावे, यामुळे तुमचा मेंदू शांत होईल आणि तुम्हाला बरं वाटले. नियमित चालण्याचा व्यायाम केल्यास मूड सुधारेल.
- पौष्टिक पदार्थांचे सेवन करा. कारण खाण्यापिण्याच्या सवयींचा तुमच्या मनावरही थेट परिणाम होतो.
- रोज कमीत कमी सात ते आठ तास झोपावे. पुरेशा प्रमाणात झोप घेणे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असते.
- मद्यपान, अमली पदार्थांपासून दूर राहा; यामुळे एंग्झायटीची समस्या वाढू शकते.
(नक्की वाचा: Jemimah Rodrigues Favourite Seafood: जेमिमा रॉड्रिग्सला आईने केलेले हे सीफुड खायला प्रचंड आवडतं, नोट करा रेसिपी)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world


