मनोज सातवी, प्रतिनिधी
Nalasopara News : राज्यात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटना सातत्यानं उघड होत आहेत. बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी दोन अल्पवययीन विद्यार्थींचं सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात घडले. त्यापाठोपाठ नालासोपाऱ्यातही या प्रकारची एक संतापजनक घटना उघड झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माणुसकीला काळिमा फासणारी घटना आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. येथे दोन नराधमानी एका दहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आचोळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दहा वर्षीय मुलीसोबत 2 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. पीडित मुलगी ही इतर मुलांसोबत गणपतीच्या आगमन सोहळ्यात सामील होण्यासाठी घरातून बाहेर गेली होती, तिथून परतत असताना तिला ओळखीचे दोन व्यक्ती भेटले. दोघेही त्याच परिसरात राहणार होते, त्यामुळे त्यांनी पीडित मुलीला बोलण्यात गुंतवून नंतर तिला जबरदस्तीने निर्जन स्थळे घेऊन गेले. त्याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
( नक्की वाचा : Nagpur Hit and Run प्रकरणाला नवं वळण, CCTV फुटेजनंतर पोलिसांचे 2 मोठे खुलासे )
बऱ्याच वेळा पासून मुलगी घरी न आल्यामुळे मुलीचा घरातील मंडळींकडून शोध सुरू होता. त्यानंतर कपडे फाटलेल्या अवस्थेत मुलगी घरी परतल्यानंतर घरच्या मंडळींना मोठा धक्का बसला. पीडित मुलीच्या महिती नुसार त्यांच्या परिचित असणाऱ्या आरोपी राहुल सिताराम धेंडे (वय 41) आणि शाू उर्फ लंबू (वय 35) या दोन नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सामूहिक बलात्कार, अपहरण आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world