जाहिरात

Naxalite Killed : आणखी 14 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादीही संपवला!

छत्तीसगड आणि ओडिसाच्या सीमावर्ती भागात मोठी नक्षलवादी चकमक झाली असून यामध्ये मोठे नक्षली नेते मारले गेल्याची माहिती आहे.

Naxalite Killed : आणखी 14 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादीही संपवला!

छत्तीसगड आणि ओडिसाच्या सीमावर्ती भागात मोठी नक्षलवादी चकमक झाली असून यामध्ये मोठे नक्षली नेते मारले (Naxal leaders killed) गेल्याची माहिती आहे. या चकमकीत दोन महिला नक्षलींसह एकूण 14 जण मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीनंतर,1 एसएलआरसह मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. ओडिशा अँटी नक्षल फोर्स (SOG), छत्तीसगड पोलीस आणि CRPF च्या संयुक्त पथकांनी ही कारवाई करण्यात आली होती. छत्तीसगडमधील कुलपाडा येथील जंगलात आणि ओडिशातील नौपाडा जिल्ह्यातील परिसरात ही चकमक झाली होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 36 तासांपासून नक्षलवादी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक सुरू होती. यात एकूण 14 नक्षलवादी मारले गेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एक कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचाही या चकमकीत खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर केली पोस्ट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट करीत लिहिलं की, या चकमकीने नक्षलवाद्यांना आणखी एक झटका बसला आहे. ओडिशा-छत्तीसगड सीमेवर सीआरपीएफ, एसओजी ओडिशा आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्त अभियानाअंतर्गत 14 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. नक्षलमुक्त भारताचा संकल्प आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आज नक्षलवाद शेवटच्या घटका मोजत आहे. 

चकमकीनंतर केलेल्या शोध मोहिमेत 20 जानेवारीला दोन मृतदेह सापडले होते. यात एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश होता. मात्र आज मृतदेहांची संख्या वाढली. शोध मोहिम अद्यापही सुरू असून मृतदेहांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com